आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Cases India State Wise LIVE Update; Delhi Bhopal Indore Mumbai Delhi | Coronavirus Outbreak 21 September 2021

कोरोना देशात:गेल्या 3 दिवसांमध्ये 31 हजारांपेक्षा जास्त ॲक्टिव्ह केस कमी झाल्या, आता 3.02 लाख रुग्णांवर सुरु आहेत उपचार, हे गेल्या सहा महिन्यात सर्वात कमी

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रात सोमवारी 2,583 लोक संक्रमित आढळले.

देशात गेल्या 24 तासांमध्ये 24,897 नवीन कोरोना संक्रमित आढळले. 34,467 बरे झाले आणि 251 जणांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे 9,827 अॅक्टिव्ह केस म्हणजेच उपरा करत असलेले रुग्ण कमी झाले. आता केवळ 3.02 लाख संक्रमितांवर उपचार सुरू आहेत. हा आकडा 19 मार्चनंतर सर्वात कमी आहे. तेव्हा 2.82 लाख अॅक्टिव्ह प्रकरणे होते. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 20 मार्चला वाढून 3.06 लाख झाली होती. देशात गेल्या तीन दिवसांमध्ये 31,363 अॅक्टिव्ह केस कमी झाले आहेत.

तर महाराष्ट्रात सोमवारी 2,583 लोक संक्रमित आढळले. 3,836 लोक बरे झाले आणि 28 जणांचा मृत्यू झाला. येथे आतापर्यंत 65.24 लाख लोक संक्रमित झाले आहेत. यामध्ये 63.40 लाख बरे झाले आहेत, तर 1.38 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या 41,672 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशात कोरोना महामारी आकड्यांमध्ये

  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण नवीन केस आल्या : 24,897
  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण बरे झाले : 34,467
  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण मृत्यू : 251
  • आतापर्यंत एकूण संक्रमित झाले : 3.35 कोटी
  • आतापर्यंत एकूण बरे झाले : 3.27 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.45 लाख
  • सध्या उपचार करत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या : 3.02 लाख
बातम्या आणखी आहेत...