आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Coronavirus Cases India State Wise LIVE Update; Delhi Bhopal Indore Mumbai Delhi | Coronavirus Outbreak | Rajasthan Haryana Kerala West Bengal COVID Vaccination Latest News

कोरोना देशात:24 तासात 30164 नवीन रुग्ण आढळले आणि 42946 झाले बरे, अ‍ॅक्टिव्ह रुग्णांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी घट, नवीन प्रकरणांचा आकडा 14 दिवसात सर्वात कमी

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • रविवारी, महाराष्ट्रात 3,626 लोक संक्रमित आढळले.

देशातील कोरोनाची आकडेवारी सोमवारी दिलासा देणारी होती. गेल्या 24 तासांत 30,164 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली. 42,946 रुग्ण बरे झाले आणि 290 संक्रमित मरण पावले. यासह, सक्रिय प्रकरणांमध्ये 13,086 ची घट नोंदवण्यात आली. सलग दुसऱ्या दिवशी यामध्ये घट झाली आहे. सध्या 3.85 लाख लोकांवर उपचार सुरू आहेत. नवीन प्रकरणांविषयी बोलायचे झाले तर, गेल्या 14 दिवसात रविवारी सर्वात कमी प्रकरणे नोंदवण्यात आली. याआधी 23 ऑगस्ट रोजी 24,794 संक्रमित व्यक्तींची ओळख पटली होती.

रविवारी, महाराष्ट्रात 3,626 लोक संक्रमित आढळले. 5,988 लोक बरे झाले आणि 37 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 64.89 लाख लोक संसर्गाच्या कचाट्यात आले आहेत. यापैकी 63 लाख लोक बरे झाले आहेत, तर 1.37 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या 47,695 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशात कोरोना महामारी आकड्यांमध्ये...

 • गेल्या 24 तासांमध्ये एकूण नवीन प्रकरणे आली: 30,164
 • गेल्या 24 तासांमध्ये एकूण बरे झाले: 42946
 • गेल्या 24 तासांमध्ये एकूण मृत्यू: 290
 • आतापर्यंत एकूण संक्रमित: 3.30 कोटी
 • आतापर्यंत बरे झाले: 3.22 कोटी
 • आतापर्यंत एकूण मृत्यू: 4.41 लाख
 • सध्या उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांची संख्या: 3.85 लाख
बातम्या आणखी आहेत...