आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Cases India Update; Haryana Jaipur Maharashtra | Vaccination | Corona Case

कोरोना:सलग आठव्या दिवशी कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्ये घट, 24 तासांत 4282 नवीन रुग्ण; 14 मृत्यू

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दिवसभरात कोरोनाचे 4 हजार 282 नवीन रुग्ण आढळून आले आहेत, 6 हजार 037 लोक बरे झाले. 14 जणांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. 25 दिवसांनंतर देशात 5 हजारांहून कमी नवीन रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी 4 एप्रिल रोजी 4 हजार 435 नवीन रुग्ण आढळले होते. देशात सक्रिय रुग्ण सातत्याने कमी होत आहेत. रविवारी 47 हजार 246 सक्रिय रुग्णसंख्या होती. यापूर्वी 12 एप्रिल रोजी 44,998 लोक उपचार घेत होते.

8 दिवसांपासून नवीन रुग्णांची संख्या 10 हजारांहून कमी
22 एप्रिल रोजी कोरोनाचे 10 हजार 112 नवीन रुग्ण आढळले, तर 29 जणांचा मृत्यू झाला. तेव्हापासून सातत्याने 10 हजारांहून कमी नवीन रुग्ण आढळले आहेत. रविवारी (23 एप्रिल) 6 हजार 904 नवीन रुग्ण आढळले, 16 जणांचा मृत्यू झाला. सोमवारी (24 एप्रिल) ६ हजार ९३४ नवे बाधित आढळले तर 24 मृत्यू झाले.

मंगळवारी (२५ एप्रिल) ९ हजार ६२९ रुग्ण दाखल झाले तर २९ जणांचा मृत्यू झाला. त्याच वेळी, बुधवारी म्हणजेच (26 एप्रिल) देखील 9 हजार 355 रुग्णसंख्या नोंदवली गेली. गुरुवारी (२७ एप्रिल) ७ हजार ५३३ नवीन रुग्ण आढळले तर 44 जणांचा मृत्यू झाला होता.

शुक्रवारी (28 एप्रिल) 7 हजार 171 रुग्ण आढळले असून 40 जणांचा मृत्यू झाला. शनिवारी (29 एप्रिल) 5 हजार 874 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 25 जणांचा मृत्यू झाला.

टॉप-5 राज्यांमध्ये 57% पेक्षा जास्त नवीन रुग्ण, केरळ आघाडीवर
गेल्या 24 तासांत देशात 4,282 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 2,443 रुग्ण फक्त 5 राज्यांमध्ये आहेत. हे एकूण आकडेवारीच्या 57% पेक्षा जास्त आहे.

केरळ : येथे 942 नवीन रुग्ण आढळले, 1,329 लोक बरे झाले, तर 6 लोकांचा मृत्यू झाला. सध्या येथे 10,730 सक्रिय रुग्ण आहेत.

महाराष्ट्र : येथे गेल्या दिवशी 425 नवीन रुग्ण आढळले आणि 499 लोक बरे झाले. एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. सध्या 4,005 सक्रिय रुग्ण आहेत.

दिल्ली: येथे 405 नवीन रुग्ण आढळले, तर 3 लोकांचा मृत्यू झाला. तेथे 811 लोक कोरोनामधून बरे झाले आहेत. येथे 3,031 सक्रिय रुग्ण आहेत.

हरियाणा: यहां 320 नए केस मिले, एक की भी मौत नहीं हुई है। वहीं 455 लोग कोरोना से रिकवर हुए हैं। यहां 3,830 एक्टिव केस है।

उत्तर प्रदेश : येथे 351 नवीन रुग्ण आढळले, 1 जणाचा मृत्यू झाला तर 434 लोक कोरोनामधून बरे झाले आहेत. येथे 2,897 सक्रिय रुग्ण आहेत.

हरियाणा: येथे 320 नवीन रुग्ण आढळले, एकाचाही मृत्यू झालेला नाही. तर 455 लोक कोरोनामधून बरे झाले आहेत. येथे 3,830 सक्रिय रुग्ण आहेत.