आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Cases । National COVID 19 Recovery Rate । Nationwide Vaccination Drive । Maharashtra । Coronavirus Positive Cases । Anti Covid Vaccine

कोरोना संक्रमणावर दिलासादायक बातमी:मुंबईत पहिल्यांदाच गेल्या 24 तासांत एकही मृत्यू नाही; 7 महिन्यांनंतर देशातील नवे रुग्ण 14 हजारांवर

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना महामारीच्या प्रारंभापासून मुंबईत कोविडमुळे कोणाचाही मृत्यू झाला नसल्याची ही पहिलीच वेळ आहे. मीडिया रिपोर्ट्सचा हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. रविवारी मुंबईत एकूण 367 प्रकरणे नोंदवली गेली, परंतु गेल्या वर्षीच्या कोरोना महामारीच्या सुरुवातीनंतर पहिल्यादांच असे झाले की, कोरोनामुळे कुणाचाही मृत्यू झाला नाही.

सकारात्मकता दर देखील खूप कमी होता आणि रविवारी 1.27% नोंदवला गेला. सध्या मुंबईत फक्त 5,030 सक्रिय प्रकरणे आहेत. दुसऱ्या लाटेत, एका दिवसात 11 हजारांहून अधिक सक्रिय प्रकरणे येथे दिसली.

देशात संक्रमणाच्या नवीन प्रकरणांमध्येही घट झाली आहे. 7 महिन्यांनंतर, दैनंदिन प्रकरणे 14 हजारांच्या जवळ आली आहेत. शनिवारी 11 लाख 123 चाचण्या करण्यात आल्या, ज्यात 14,146 रुग्ण पॉझिटिव्ह आले. तर 144 रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या 24 तासांत 19 हजार 788 लोक संसर्गातून बरे झाले आहेत.

यासह, दैनंदिन प्रकरणांची टक्केवारी 1.29 वर आली आहे. याचा अर्थ, 100 लोकांची चाचणी केल्यानंतर, 1.29 रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. गेल्या 48 दिवसांपासून सकारात्मकतेचा दर 3 टक्क्यांपेक्षा कमी आहे. तथापि, साप्ताहिक सकारात्मकता दर 1.42%आहे. देशात लसीकरणाचा वेगही वाढला आहे. आदल्या दिवशी देशभरात 41 लाख 20 हजार 772 लसीचे डोस देण्यात आले.

5 पॉइंटमध्ये समजून घ्या देशात कशी आहे कोरोना संक्रमणाची परिस्थिती

  • शनिवारपर्यंत 59 कोटी 9 लाख 35 हजार 318 टेस्ट करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत देशाीत लसीचे 97.65 कोटी डोस देण्यात आले आहेत.
  • देशात कोरोना संक्रमणामुळे मरण पावणाऱ्यांची संघ्या 4 लाख 52 हजार 124 झाली आहे.
  • कोरोनाचे अॅक्टिव्ह प्रकरणे 1 लाख 95 हजार 846 झाले आहेत. जे आतापर्यंत आलेल्या एकूण प्रकरणाच्या 0.57 टक्के आहे.
  • देशाचा संयुक्त रिकव्हरी रेट वाढून 98.10% झाला आहे. हा मार्च 2020 पासून आतापर्यंत सर्वात जास्त आहे. एकूण रिकव्हरी नंबर वाढून 3 कोटी 34 लाख 19 हजार 749 पर्यंत पोहोचला आहे.
  • राज्यांच्या हिशोबाने शनिवारी कोरोनाचे सर्वात जास्त 7,955 प्रकरणे केरळमध्ये दाखल करण्यात आले आहेत. यानंतर 1,553 महाराष्ट्र, 1,233 तामिळनाडू, 4,43 पश्चिम बंगाल आणि 3,58 ओडिशामध्ये समोर आले आहेत.
बातम्या आणखी आहेत...