आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले असून रविवारी दुपारी हाती आलेल्या आकडेवारीनुसार गत 24 तासांत देशात कोरोनाचे 3,834 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यासोबतच सक्रिय रुग्णांची संख्याही वाढून 18,389 झाली आहे. तर कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढून 5.30 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. तर संक्रमित लोकांची आकडेवारी 4.47 कोटींच्या पार गेली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या बुलेटिननुसार शनिवारी कोरोनाचे 2,994 नवे रुग्ण आढळले होते. तर गेल्या 24 तासांविषयी बोलायचे झाल्यास सक्रिय रुग्णसंख्या एकूण संक्रमणाच्या 0.04% आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 2.87% आले. तर आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट 2.24% आहे. आतापर्यंत देशातील 4.41 कोटी लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृत्यूदर 1.19% नोंदवण्यात आला आहे.
दिल्लीत 416 नवे रुग्ण आढळले
दिल्लीतही वेगाने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. दिल्लीच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार शनिवारी राज्यात कोरोनाचे 416 नवे रुग्ण आढळले. ही गेल्या 7 महिन्यांतील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. तर पॉझिटिव्हिटी रेट 14.37% आहे. बुलेटिननुसार, गेल्या 24 तासांत कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या आता 26 हजार 529 झाली आहे.
देशातील दैनंदिन रुग्णसंख्येत 90% हिस्सेदारी 10 राज्यांची
देशात आढळत असलेल्या दैनंदिन रुग्णसंख्येपैकी 90% रुग्ण 10 राज्यांतील आहेत. यात केरळमधील 884, महाराष्ट्रातील 669, दिल्लीतील 416, गुजरातमधील 372, हिमाचलमधील 354, कर्नाटकातील 247, तमिळनाडूतील 156, हरियाणातील 142, गोव्यातील 117 आणि उत्तर प्रदेशातील 113 रुग्णांचा समावेश आहे. या राज्यांची एकूण रुग्णसंख्या 3,470 आहे. म्हणजेच गेल्या 24 तासांत आढळलेल्या रुग्णसंख्येत या 10 राज्यांतील 90% रुग्णांचा समावेश आहे. 24 तासांत कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू झाला आहे. यात केरळमधील 2, दिल्ली, हरियाणा व राजस्थानातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
कोरोनाचा वाढता प्रसार पाहता आरोग्य मंत्रालयाने देशभरात नवीन गाइडलाइन जारी केली आहे
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.