आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:7 महिन्यांनी दैनंदिन रुग्णसंख्या 6 हजारांवर; 24 तासांत 6,050 नवे रुग्ण, केंद्र-राज्यांच्या बैठकीत टेस्टिंग वाढवण्यावर भर

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. गेल्या 24 तासांत देशात 6050 नवीन रुग्ण आढळले असून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांचा आकडाही 28 हजार 303 वर पोहोचला आहे.

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत आढावा बैठक घेतली. त्यांनी सर्व राज्यांना 10 आणि 11 एप्रिल रोजी रुग्णालयांमध्ये पायाभूत सुविधांचे मॉक ड्रिल करण्यास सांगितले. 8 आणि 9 एप्रिल रोजी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य अधिकाऱ्यांसोबत तयारीचा आढावा घेतला जाणार आहे.

मांडविया म्हणाले- राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत आढावा बैठक घेतली. या दरम्यान, कोविड चाचणी आणि जीनोम सिक्वेन्सिंगसह, कोविड नियमांचा प्रसार वाढविण्यावर चर्चा झाली. आपण सतर्क राहायला हवे आणि भीती पसरवू नये.

याआधी बुधवारी कोविड एम्पॉवरमेंट वर्किंग ग्रुपने नियमित आढावा बैठक घेतली. या बैठकीला डॉ. व्ही.के. पॉल, डॉ. राजीव बहल, महासंचालक, ICMR आणि इतर वरिष्ठ आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे
कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या सकारात्मकता दर 3.32% आहे. मार्चच्या 31 दिवसांत कोरोनाचे 31,902 रुग्ण आढळले. त्या तुलनेत एप्रिलच्या 5 दिवसांतच 20,273 नवीन रुग्ण आढळले आहेत. मार्चमधील एकूण नवीन रुग्णांपैकी हे 63.5% आहे.

सरासरी पाहिल्यास मार्चमध्ये दररोज सरासरी 1 हजार नवीन केसेस आढळून आल्या, तर एप्रिलमध्ये दररोज सरासरी 4 हजार केसेस समोर येत आहेत. संसर्गाचा दर असाच राहिला तर एप्रिलमध्ये १.२० लाख नवीन रुग्णांची शक्यता आहे. तथापि, ज्या प्रकारे दररोज नवीन रुग्ण वाढत आहेत त्यानुसार एप्रिलमधील एकूण रुग्ण यापेक्षा जास्त असू शकतात.

टॉप-5 राज्यांमध्ये दोन तृतीयांश नवीन रुग्ण, केरळ आघाडीवर
मंगळवारी देशात आढळलेल्या 5,335 नवीन रुग्णांपैकी 3,730 फक्त 5 राज्यांमध्ये आढळले. यामध्ये केरळ आघाडीवर आहे. येथे सुमारे 2 हजार नवीन रुग्ण आढळले आहेत. यानंतर महाराष्ट्रात 569, दिल्लीत 509, हिमाचल प्रदेशात 389 आणि गुजरातमध्ये 351 रुग्ण आढळले आहेत.

केरळ : येथे 1,912 नवीन रुग्ण आढळले आहेत, 500 लोक बरे झाले आहेत आणि 1,404 लोक उपचार घेत आहेत. मंगळवारी देखील केरळमध्ये 1,025 नवीन रुग्णसंख्या नोंदवली गेली. यापूर्वी 22 सप्टेंबर रोजी 2300 रुग्णसंख्या समोर आली होती.

महाराष्ट्र : येथे 569 नवीन रुग्ण आढळले आहेत, 485 लोक बरे झाले आहेत तर 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी येथे 711 नवीन रुग्ण आढळले. येथे सकारात्मकता दर 6.32% आहे.

दिल्ली : बुधवारी येथे 509 नवीन रुग्णसंख्या नोंदवली गेली, 424 लोक या आजारातून बरे झाले. सक्रिय रुग्णसंख्या 1,795 वर गेली आहेत. येथे सकारात्मकता दर 26.54% आहे.

हिमाचल प्रदेशः येथे बुधवारी 389 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 177 लोक बरे झाले आहेत. सध्या राज्यात 212 सक्रिय रुग्ण आहेत. येथे सकारात्मकता दर 8.22% वर गेला आहे.

गुजरात : येथे 351 नवीन रुग्ण आढळले आहेत. 1 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे आणि 395 लोक बरे झाले आहेत. मंगळवारी येथे 324 नवीन रुग्ण आढळले. येथे सकारात्मकता दर 1.76% आहे.