आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Chardham Yatra 2020 Update : Kedarnath Dham Rawal Standard In Maharashtra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चारधाम यात्रा:केदारनाथचे रावल (पुजारी) महाराष्ट्रात अडकले, केदारनाथचा सुवर्ण मुकुटही त्यांच्याकडेच; कपाट उघडतेवेळी त्यांचे तिथे असणे आवश्यक

देहरादूनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
केदारनाथचे रावल स्वत: पूजा करत नाहीत, परंतु त्यांच्या सूचनांनुसार मंदिरातील पुजारी पूजा करतात. - Divya Marathi
केदारनाथचे रावल स्वत: पूजा करत नाहीत, परंतु त्यांच्या सूचनांनुसार मंदिरातील पुजारी पूजा करतात.
  • या दिवशी उघडणार मंदिराचे कपाट, यावेळी चारधामचे दर्शन ऑनलाईन करण्यावर विचार आणि विवाद

केदारनाथ मंदिराचे प्रमुख रावल (पुजारी) महाराष्ट्रातील नांदेड येथे अडकले आहेत. कपाट उघडण्यापूर्वी त्यांनी केदारनाथला जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून परवानगी मागितली आहे. रावल (पुजारी) भीमाशंकर यांनी यासाठी पंतप्रधानांना एक पत्र लिहिले आहे. त्यांनी रस्ते मार्गाने उत्तराखंडला जाण्यासाठी परवानगी मागितली आहे. मात्र त्यांना अद्याप पत्राचे कोणतेही उत्तर मिळाले नाही. 

यादरम्यान उत्तराखंड सरकार त्यांना एअरलिफ्ट करण्याचा विचार करत आहे. त्याच्यांसोबत मंदिर ट्रस्टचे चार लोक देखील आहे. केदारनाथला घालण्यात येणारा सुवर्ण मुकुट देखील त्यांच्याकडेच आहे. लॉकडाउनमुळे टिहरी राजघराण्याचे सदस्यांचे पोहोचणे देखील कठीण होत आहे. परंपरेनुसार कपाट उघडतेवेळी त्यांचे तिथे असणे आवश्यक आहे. 

29 एप्रिल रोजी उघडणार केदारनाथचे कपाट 

केदारनाथचे कपाट 29 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजेपासून उघडणार आहे. तर यापूर्वी, यमोत्री गंगोत्री दरवाजे 26 एप्रिल रोजी उघडतील. मात्र, यावेळी चारधाम मंदिरांचे दर्शन ऑनलाईन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र स्थानिक लोक आणि पुजाऱ्यांनी यावर आक्षेप घेतला आहे.

परंपरेनुसार केवळ रावलच (पुजारी) मूर्तीला स्पर्श करु शकतात

केदारनाथचे रावल (पुजारी) महाराष्ट्र, कर्नाटक आणि बद्रीनाथ किंवा केरळ येथून असतात. हे लोक येथूनच दरवर्षी प्रवास करतात. परंपरेनुसार केदारनाथचे रावल स्वतः पूजा करत नाहीत, परंतु यांच्या निर्देशांवर पुजारी मंदिरात पूजा करतात. तर बद्रीनाथच्या रावल शिवाय इतर कोणालाही बद्रीनाथच्या मूर्तीला स्पर्श करता येत नाही. 

टिहरी महाराजांची जन्मकुंडली पाहूनच कपाट उघडण्याची तारीख निश्चित केली जाते 

टिहरी दरबारात नरेंद्र नगरमध्ये टिहरी महाराजांची जन्मकुंडली पाहून मंदिराचे कपाट उघडण्याची तारीख निश्चित केली जाते. टिहरी राजघराण्यातील लोक बद्रीनाथचे कपाट उघडतेवेळी तिथे असणे आवश्यक असेत आणि त्यांचेच राज पुरोहित पूजा करतात. 

बातम्या आणखी आहेत...