आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Coronavirus COVAXIN Vaccine Production Vs Calf Serum; What's The Controversy? All You Need To Know

एक्सप्लेनर:कोव्हॅक्सिनमध्ये गायीच्या वासराचे सीरम नाही, व्हॅक्सीनसाठी सेल्स बनवण्यासाठी झाला आहे वापर; यावर वाद का?

नवी दिल्ली (रवींद्र भजनी)4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • कॉंग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक गौरव पांधी यांच्या ट्विटने ही बाब चव्हाट्यावर आली.

कोव्हॅक्सिन तयार करण्यासाठी भारत बायोटेकने नवजात वासराचा सीरम वापरला आहे. विकास पाटणी यांनी माहितीच्या अधिकाराखाली केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (CDSCO) कडून ही माहिती मिळवली. याविषयी आता सगळीकडे एवढा मोठा वाद निर्माण झाला आहे की, सरकार आणि भारत बायोटेक, दोघांनाही स्पष्टीकरण द्यावे लागले.

कॉंग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक गौरव पांधी यांच्या ट्विटने ही बाब चव्हाट्यावर आली. त्यांनी आरटीआयच्या उत्तरात सापडलेली कागदपत्रे शेअर केली आहेत. पांधी म्हणाले, 'नरेंद्र मोदी सरकारने हे मान्य केले आहे की भारत बायोटेकच्या लसीमध्ये गायीच्या वासराचे सीरम आहे. हे खूप वाईट आहे. ही माहिती लोकांना अगोदर कळवायला हवी होती.

तत्काळ भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा उत्तर देण्यासाठी पुढे आले आणि म्हणाले की कॉंग्रेस जनतेची दिशाभूल करत आहे. चला तर मग समजून घेऊया की, हे प्रकरण काय आहे, तुमचे प्रश्न आणि एक्सपर्टच्या उत्तरांमधून....

लस बनवण्यासाठी वासराच्या सीरमचा वापर होतो का?

 • होय, ही एक सामान्य प्रक्रिया आहे. भारतातील बहुतेक सर्व लस उत्पादक ते वापरतात. पोलिओ लस देखील अशाच प्रकारे बनवली जाते.
 • खरेतर लस बनवण्यासाठी व्हायरस कमजोर केला जातो. यासाठी मोठ्या संख्येने व्हायरस आवश्यक आहे. लस कंपन्या पेशी विकसित करण्यासाठी वासराचा सीरम वापरतात. त्यात व्हायरस मिसळला केला जातो. नंतर हे विषाणू कमकुवत केले जातात आणि लसीमध्ये घेतले जातात.

मग आपण जी कोव्हॅक्सिन घेत आहोत, त्यामध्ये वासराचे सीरम आहे?

 • नाही, त्यात वासराचे सीरम नाही. खरेतर, वासराच्या सीरमचे काम खूप मर्यादित असते. लस बनवण्यापूर्वी, पेशी विकसित होतात, ज्यास व्हायरसने इंफेक्ट केले जाते. या पेशी तयार करण्यासाठी वासराचा सीरम नक्कीच वापरला जातो.
 • जेव्हा पेशी विकसित होतात तेव्हा त्यांना प्यूरीफाय केले जाते. या दरम्यान पेशी रासायनिक प्रक्रियेतून जातात आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये वासराच्या सीरमचा अंश राखण्याची कोणतीही शक्यता नसते. भारत बायोटेकच्या मते, यामुळे, अंतिम उत्पादन म्हणजेच कोव्हॅक्सिनमध्ये वासराचे सीरम राहत नाही.

सीरमसाठी वासरांची हत्या केली जात आहे का?

 • नाही, वैज्ञानिक दिर्घकाळापासून गायीच्या भ्रूणचा वापर करतात. पहिले यासाठी गर्भवती गायींना मारले जात होते. मात्र आता प्रक्रिया बदलली आहे. प्राण्यांचा क्रूरतेपासून बचाव करण्यासाठी आता नवजात वासरांचा ब्लड सीरम घेतला जातो. सामान्यतः जन्माच्या 3 ते 10 दिवसांच्या आत हे काढले जाते.
 • भारतात गोहत्या बंदी आहे. यामुळे जास्तीत जास्त ब्लड सीरम बायोलॉजिकल रिसर्च करणाऱ्या लॅब्समधून आयात केले जाते. वाणिज्य मंत्रालयानुसार भारताने 2019-20 मध्ये दोन कोटी रुपयांचे सीरम इंम्पोर्ट केले होते. यावर्षी हा आकडा खूप वाढू शकतो. कारण एप्रिल आणि जूनच्या दरम्यान म्हणजेच जवळपास तीन महिन्यात 1.5 कोटी रुपयांचे सीरम इम्पोर्ट झाले आहे.

लस बनवण्यासाठी 7 प्राण्यांचा होतो वापर
गेल्या 60 वर्षांपासून व्हॅक्सीन बनवण्यासाठी प्राण्यांचा वापर होत आहे. यामध्ये 7 प्रमुख आहेत...

 1. घोडा : वयस्करांसाठी वापरल्या जाणाऱ्या लसीच्या औषधांचा वापर पहिले यांच्यावर केला जातो.
 2. गिनी पिग्स :व्हॅक्सीन टेस्ट होते. इबोलाच्या व्हॅक्सीनसाठी वापर झाला होता.
 3. माकडं : मनुष्यांपूर्वी यांच्यावर वापर केला जातो, जेणेकरुन साइड इफेक्टवर नजर ठेवता येऊ शकते.
 4. उंदीर : व्हॅक्सीनने शरीराच्या इम्यून रिस्पॉन्सची तपासणी करण्यासाठी वापर होतो.
 5. डुक्कर : फिजियोलॉजी आणि इम्यून सिस्टम मनुष्यापासून मिळते, यामुळे टेस्ट होते.
 6. वासरु आणि गुरे : विरो सेल्सच्या प्रोडक्शनसाठी सीरमचा वापर होतो.

मग यावर एवढे राजकारण आणि गदारोळ का होत आहे?

 • या प्रकरणाद्वारे कॉंग्रेसने सोशल मीडियावर केंद्र सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. कोवॅक्सिनमध्ये गायीच्या वासराचे रक्त असल्याची बाब सरकारने लपवून ठेवल्याचा आरोप केला. त्याला उत्तर देताना भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, कॉंग्रेस पक्ष या लसीबाबत संभ्रम पसरवत आहे. कॉंग्रेस पाप करत आहे.
 • परंतु तज्ञ म्हणतात की जगभरात लस तयार करण्याच्या प्रक्रियेत वासराच्या रक्तामधून सीरम काढला जातो. हा विषय राजकारणाचा नाही तर विज्ञानाचा आहे. आणि हे प्रथमच घडत नाही.

सरकारने खरच ही गोष्ट लपवली का?
नाही, भारत बायोटेकने प्री-क्लीनिकल ट्रायल्सपासून प्रत्येक संशोधनात याची माहिती दिली आहे. आणि ही कोणतीही नवीन गोष्ट नाही. ही एक स्टँडर्ड प्रक्रिया आहे. ज्यामध्ये लपवले नाही, तर सांगितले जाते.

आता यावर सरकार आणि कंपनीचे काय मत आहे?

 • सोशल मीडियावर गदारोळ सुरू झाला तर केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि भारत बायोटेकने स्पष्टीकरण जारी केले. मंत्रालयाने म्हटले आहे की, तथ्यांची मोड-तोड करुन सादर केले जात आहे. नवजात वासरांच्या सीरमचा वापर विरो सेल्सची संख्या वाढवण्यासाठी केला जातो. विरो सेल्स वाढवण्यासाठी जगभरात ही प्रक्रिया अवलंबली जाते. फक्त कोविडच नाही तर पोलियो, रेबीज आणि इनफ्लुएंजा व्हॅक्सीनही अशीच तयार केली जाते.
 • या विरो सेल्स पानी, केमिकल्स आणि इतर प्रक्रियांनी स्वच्छ केले जाते. हे नवजात वासरांच्या सीरममधून मुक्त केले जाते. याच्या नंतरच विरो सेल्सला व्हायरल ग्रोथसाठी कोरोना व्हायरसने इंफेक्ट केले जाते.
 • यामुळे अंतिम प्रोडक्ट (कोव्हॅक्सिन) मध्ये नवजात वासरांचे सीरम नसते. व्हॅक्सीनच्या अंतिम प्रोडक्टमध्ये इनग्रेडिएंट म्हणून याचा समावेश नसतो.

काय म्हणतात विशेषज्ञ?
वायरोलॉजिस्ट शाहिद जमील म्हणतात की, व्हॅक्सीन बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये गायीच्या वासराच्या ब्लड सीरमचा वापर करणे नवीन गोष्ट नाही. रेबीज, इनफ्लुएंजा सारख्या लसीमध्येही याचा वापर झाला आहे. याचा अर्थ असा नाही की, व्हॅक्सीनमध्ये वासराचे ब्लड सीरम आहे. हा प्रश्नच चुकीचा आहे. ही एक साइंटिफिक प्रक्रिया आहे, भारतच नाही तर जगभरात ही प्रक्रिया अवलंबली जाते.

बातम्या आणखी आहेत...