आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus । Covid 19 । Delta Variant । R Value । Senior Virologist । Epidemiologists

डेल्टा व्हेरिएंटने पुन्हा घाबरवले:कोरोनाचा एक रुग्ण आता एकापेक्षा जास्त लोकांना करत आहे संक्रमित, एका महिन्यात R व्हॅल्यू 0.93 ने वाढून 1.01 झाली

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • केरळमध्ये आर व्हॅल्यू 1.06%आहे. येथे दररोज 20 हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत.

जगभरात चिंतेचे कारण बनलेल्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने भारतात संक्रमणाची प्रकरणे वाढण्यास सुरुवात केली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्स, चेन्नईच्या मते, देशातील आर व्हॅल्यूचा दर एका महिन्यात 0.93 वरून 1.01 टक्के झाला आहे. म्हणजेच, आता एक कोरोना रुग्ण एकापेक्षा जास्त व्यक्तींमध्ये संसर्ग पसरवत आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजीचे संचालक डॉ.मनोज म्हणाले की, आर व्हॅल्यूत झालेली वाढ अतिशय चिंताजनक आहे. यामुळे संसर्गानंतर मृत्यू आणि रुग्णालयात दाखल होण्याच्या संख्येतही वाढ होत आहे. सर्वाधिक आर व्हॅल्यू मध्य प्रदेश (1.31) आणि हिमाचल प्रदेश (1.3) मध्ये आहे. याशिवाय महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये आर मूल्याचा दर 1.01 टक्के आहे. केरळमध्ये आर व्हॅल्यू 1.06%आहे. येथे दररोज 20 हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत.

कोरोनाचे आर व्हॅल्यू म्हणजे काय आहे?
डेटा शास्त्रज्ञांच्या मते, आर फॅक्टर म्हणजे पुनरुत्पादन दर. हे सांगते की संक्रमित व्यक्तीद्वारे किती लोक संक्रमित आहेत किंवा होऊ शकतात. जर आर फॅक्टर 1.0 पेक्षा जास्त असेल तर याचा अर्थ प्रकरणे वाढत आहेत. त्याच वेळी, R फॅक्टर 1.0 पेक्षा कमी असणे किंवा कमी होत जाणे रुग्ण कमी होण्याचा संकेत असतो.

हे यावरुन देखील समजू शकतो की, जर 100 व्यक्ती इन्फेक्टेड असतील. तर ते 100 लोकांना इन्फेक्ट करतात तर आर व्हॅल्यू 1 असेल. जर ते 80 लोकांना संक्रमित करतात तर आर व्हॅल्यू 0.80 असेल.

या अभ्यासानुसार, 9 मार्च ते 21 एप्रिल दरम्यानची R व्हॅल्यू 1.37 होती. यामुळे याकाळात प्रकरणे झपाट्याने वाढत होते आणि दुसरी लाट आपल्या शिखरावर जात होती. 24 एप्रिल ते 1 मे दरम्यान R व्हॅल्यू 1.18 होती आणि नंतर 29 एप्रिल ते 7 मे दरम्यान ती 1.10 वर आली. तेव्हापासून R व्हॅल्यूत सातत्याने घसरण बघायला मिळाली आहे. मात्र आता पर 20 जून नंतर हे वाढून 0.88 झाले आहे. आता R व्हॅल्यू 1.01 झाली आहे. म्हणजेच केस खूप झपाट्याने वाढतील.

अमेरिकेच्या एका अभ्यासात असे समोर आले आहे की कोरोनाचे हे रूप कांजण्यांप्रमाणे लोकांमध्ये वेगाने पसरू शकते. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) ने केलेला हा अभ्यास अद्याप प्रकाशित झाला नाही, परंतु न्यूयॉर्क टाइम्समध्ये एक डॉक्यूमेंट छापले आहे. डेल्टा प्रकार कोरोना व्हायरसच्या इतर प्रकारांपेक्षा अधिक संक्रामक आहे आणि यूकेमध्ये कोरोनाची 99% प्रकरणे डेल्टा प्रकारामुळे समोर आली आहेत.

विषाणूवर केलेल्या अभ्यासामध्ये चिंताजनक गोष्ट अशी आहे की, लसीचे दोन्ही डोस घेतलेले लोक देखील डोस न घेतलेल्या लोकांप्रमाणे डेल्टा प्रकार पसरवू शकतात. सीडीसीचे संचालक डॉ. रोशेल पी. वालेंस्की म्हणाले की, लसीकरण केलेल्या लोकांच्या नाक आणि घश्यामध्ये तितकेच व्हायरस असते जितके लसीकरण न करणाऱ्या लोकांमध्ये असते. ज्यामुळे हे सहज पसरते.

बातम्या आणखी आहेत...