आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. दरम्यान, केंद्र सरकारने लसीचा तुटवडा लक्षात घेता रशियन लस 'स्पुतनिक व्ही'ला मंजुरी दिली होती. याच पार्श्वभूमीवर 'स्पुतनिक व्ही' या लसीची पहिली खेप शनिवारी भारतात दाखल झाली असून हैदराबाद येथील विमानतळावर लँड करण्यात आली. त्यामुळे देशात पुन्हा एकदा लसीकरण मोहिमेची गती वाढणार आहे. देशातील अनेक राज्यांनी 1 मेपासून 18 वर्षांवरील लोकांचे लसीकरणाच करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, लसीचा पुरवठा लक्षात घेता तो पुढे ढकलण्यात आला. विशेष म्हणजे ही लस भारतात आल्यानंतरही राज्यातील लसीचा पुरवठा लक्षात घेत भाजप शासित 5 राज्यांसह 11 इतर राज्यांनी यासाठी नकार दिला आहे.
भारत देशात या लस उत्पादकतेचे काम रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड ही कंपनी पाहते. दरम्यान, या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरिल दिमित्रीव यांनी सांगितले होते की, सध्या भारतात दरमहा 5 कोटी डोस तयार केले जातील. ते पुढे बोलताना म्हणाले की, एका वर्षात 85 कोटी डोस तयार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून मुख्य लस उत्पादकांशी तसा करारदेखील केला आहे.
केंद्राने सांगितले, राज्यांजवळ 1 कोटींपेक्षा अधिक डोस
केंद्राने सांगितले की, राज्यांजवळ आजघडीला 1 कोटींपेक्षा जास्त डोस उपलब्ध आहेत. दरम्यान, काही दिवसांत 20 लाख डोस अजून देण्यात येणार असल्याचेदेखील केंद्राने म्हटले. केंद्राने पुढे म्हटले की, 45 वर्षांवरील लोकांच्या लसीकरणासाठी डोस पुढे सुरुच राहणार असल्याचे सांगितले.
महाराष्ट्रात 1 तारखेपासून लसीकरण सुरु
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी सांगितले की, सध्या राज्यात कमी स्टॉक असल्याने आम्ही निर्धारित तारखेपासून लसीकरण सुरू करत आहोत. विशेष म्हणजे राज्यात 1 मेपासून 18+ लोकांचे लसीकरण केले जाणार होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी लोकांना केंद्रांवर गर्दी न करण्याचे आवाहन केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, कंपन्यांकडून लस मिळाल्याबरोबर लसीकरण केले जाईल असे देखील सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.