आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंपूर्ण जगात दहशत पसरवणाऱ्या सार्स कोव्ह-2 व्हायरसने महिलांपेक्षा पुरुषांचे बळी जास्त का घेतले? या कळीच्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात संशोधकांना यश आले आहे. यासंबंधीचा एक शोधनिबंध 'इंटरनॅशनल जर्नल ऑफ मॉलेक्युलर सायन्सेस' नियतकालिकात प्रकाशित झाला आहे.
या संशोधनानुसार, हा विषाणू महिलांच्या फुफ्फुसाच्या ऊतींच्या तुलनेत चरबीच्या ऊतींवर सहजपणे हल्ला करतो. याऊलट तो पुरुषांच्या थेट फुफ्फुसांच्या ऊतींवरच हल्ला करतो. त्यामुळे पुरुषांचे कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे.
काय म्हणाले संशोधक?
"आमच्या डेटाद्वारे असे स्पष्ट झाले आहे की, मादी उंदरांमधील एडिपोज टिश्यू अर्थात चरबीच्या ऊती SARS-CoV-2 साठी सिंक/रिझर्व्हरचे काम करतात. त्यामुळे फुफ्फुसांच्या ऊतींचा विषाणूच्या थेट हल्ल्यापासून बचाव होतो, असे अमेरिकेच्या हॅकेनसॅक मेरिडियन सेंटर फॉर डिस्कव्हरी अँड इनोव्हेशनच्या (सीडीआय) संशोधक ज्योती नागज्योती यांनी सांगितले आहे. या प्रकरणी चरबीच्या कार्यावरील सार्स-कोव्ह-2 संसर्गाचा प्रभाव व विशिष्ट कोविड-19 मॉडेलमध्ये चरबी कमी होण्यावरील रोगाच्या प्रभावाचे मूल्यांकन करण्यात आले.
hACE2 कोरोनाचे एन्ट्री रिसेप्टर
संशोधकांनी नर-मादी hACE2 उंदरांची तपासणी करून त्याचे तुलनात्मक विश्लेषण केले. hACE2 हे SARS-CoV-2 साठी एन्ट्री रिसेप्टर म्हणून काम करत असल्याचे स्पष्ट झाले, असेही संशोधकांनी या प्रकरणी म्हटले आहे.
नवा व्हेरिएंटचाही झपाट्याने प्रसार
कोरोनाचा नवा XBB.1.5 व्हेरिेएंटचाही जगात झपाट्याने प्रसार होत आहे. विशेषत: ज्यांना यापूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला आहे, त्यांनाही त्याचा फटका बसत आहे. अलीकडे प्रकाशित झालेल्या एका संशोधनात हा दावा करण्यात आला होता. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) हा विषाणु जवळपास 38 देशांमध्ये सापडल्याचे स्पष्ट केले आहे. अमेरिकेतील 82 टक्के रुग्ण या नव्या विषाणुचे आहेत. तर डेन्मार्कमध्ये 2 टक्के व ब्रिटनमध्ये 8 टक्के प्रकरणांमध्ये हा विषाणू आढळला आहे.
लस घेणाऱ्यांनाही संसर्ग
लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही या प्रकाराचा लोकांवर परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे डब्ल्यूएचओने कोरोनाचा धोका अद्याप टळला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
अजूनही कोरोनाचे रुग्ण समोर येत आहेत
जगावरील कोरोनाचा धोका अद्याप संपला नाही. अजूनही जगाच्या विविध देशांतून अशा आशयाच्या बातम्या येत आहेत. विशेषतः कोरोनाचे जे नवीन प्रकार उजेडात येत आहेत, त्याचे रुग्णही सर्वच देशांत आढळून येत आहेत.
कोरोनासंबंधीच्या इतर काही बातम्या वाचा
चीन कोरोना रुग्णांच्या मृतदेहांची करत आहे पावडर:मृतदेहांचा खच कमी करण्यासाठी आइसब्यूरियल तंत्राचा वापर, जाणून घ्या प्रकरण
कोरोनामुळे शेजारच्या चीनमध्ये अक्षरशः हाहाकार उडाला आहे. झिरो कोविड धोरणात सवलत दिल्यानंतर मृतांचा आकडा हजारोंवर पोहोचला आहे. यामुळे अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला होता. ही समस्या सोडवण्यासाठी म्हणजे स्मशानभूमीवरील ताण कमी करण्यासाठी चीन सरकार आइसब्यूरियल तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. या तंत्राची चाचणी चीनच्या वुहान शहरात केली जात आहे. चीनमध्ये कोरोनामुळे उत्पन्न झालेल्या स्थितीची माहिती देणाऱ्या जेनिफर जेंग यांनी ही माहिती दिली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...
चहुकडे चर्चा चीनची, पण संसर्ग लॅटिन अमेरिकेत जास्त:28 दिवसांत कोरोनाचे 87% नवे रुग्ण, WHO अहवालात धक्कादायक फॅक्ट्स
चीनमध्ये सातत्याने वाढणाऱ्या कोरोना विषाणूच्या रुग्णांची चर्चा जगभरात सुरू आहे. आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, येथे संसर्ग सर्वात वेगाने वाढत आहे. पण 21 डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या WHOच्या साप्ताहिक अहवालात एक धक्कादायक बाब समोर आली आहे.
गेल्या 28 दिवसांत लॅटिन अमेरिकन देशांमध्ये कोरोनाचा प्रसार चीनपेक्षा दुप्पट वेगाने होत आहे. चीनमध्ये कोरोनामुळे मृत्यूचा वेग अजूनही सर्वात जास्त आहे.येथे वाचा संपूर्ण बातमी...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.