आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Delhi Kerala Update, COVID 19 News; Delhi Pizza Delivery Boy Tests Positive, 72 Families Quarantine

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाच्या 3 गोष्टी:दिल्लीमध्ये पिज्जा डिलीव्हरी बॉय पॉझिटिव्ह मिळाल्यानंतर 72 कुटुंब क्वारेंटाइन; केरळमध्ये 85 वर्षीय वडिलांना कडेवर घेऊन घरी गेला तरुण

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिल्लीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबियांनी घरातील सिक्योरिटी गार्डला जबाबदार ठरवले

कोरोना संक्रमण रोखण्यासाठी केंद्र आणि देशातील सर्व राज्य सरकार जमेल त्या उपाययोजना करत आहे. यादरम्यान, संक्रमण पसरल्यामुळे आणि लॉकडाउनमुळे नागरिकांना होत असलेले त्रास समोर येत आहेत. दिल्लीत गुरुवारी एका पिज्जा डिलिव्हरी बॉयला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या 72 कुटुंबांना क्वारेंटाइन करण्यात आले. दुसरीकडे, केरळमध्ये लॉकडाउनमुळे पोलिसांनी ऑटो रोखल्यामुले मुलाल वडिलांना कडेवर घेऊन घरापर्यं जावे लागले. 

पहली गोष्ट: झोमॅटोशी संबंधित तरुणाने पिज्जा डिलीव्हरी केली

दक्षिण दिल्लीमध्ये एका पिज्जा डिलिव्हरी बॉयला कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी समोर आले. यानंतर मालवीय नगरमधील 72 कुटुंबांना क्वारेंटाइन करण्यात आले आहे. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले की, त्या तरुणासोबत काम करणाऱ्या 17 जणांनाही क्वारेंटाइन करण्यात आले आहे. यात कंपनीने सांगितले की, एका रेस्तरॉच्या कर्मचाऱ्याने अॅपवर घेतलेले काही ऑर्डर प्लेस केल्. पण, त्यावेळी आम्हाला तो कोरोना संक्रमित असल्याचे माहित नव्हते. नागरिकांच्या सुरक्षेखातर कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना मास्कचा वापर करण्यास सांगितले आहे. 

दुसरी गोष्ट: पोलिसांनी रुग्णालयातून घरी जात असलेल्या वृद्धाचा ऑटो थांबवला

केरळमध्ये लॉकडाउन असल्यामुले प्रवासाचे कोणतेच साधन उपलब्ध नाही. अशात एका व्यक्तीला आपल्या वडिलांना कडेवर उचलून घरी न्यावे लागले. कोल्लम जिल्ह्यातील एका 85 वर्षीय वृद्धाला रुग्णालयात भरती केले होते. बुधवारी त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यांना ऑटोमधून घरी नेत असताना पोलिसांनी ऑटो थांबवला. त्यानंतर 1 किलोमीटरपर्यंत वडिलांना कडेवर उचलून त्या व्यक्तीने घर गाठले. या घटनेनंतर मानवाधिकार आयोगाने याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

तिसरी गोष्ट: कुटुंबाचा आरोग- मरकजवरुन आलेल्या गार्डने माहिती लपवली

दिल्लीमध्ये 80 वर्षीय संक्रमित व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबातील लोकांनी आपल्या घरात काम करणाऱ्या सिक्टोरिटी गार्डला जबाबदार ठरवले. कुटुंबाये म्हणने आहे की, गार्ड निजामुद्दीन मरकजमध्ये जायचा. काही दिवसांपूर्वी या मरकजमधून दोन हजार लोकांना बाहेर काढले होते. त्यानंतर त्यापैकी अनेकजणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले.

बातम्या आणखी आहेत...