आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus In Mumbai: From April 2020 Till Now, 30 Million Rupees Fine Was Levied From 15 Lakh People

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईत कोरोना:एप्रिल 2020 पासून आतापर्यंत मुंबईत विना मास्क फिरणाऱ्या 15 लाख लोकांकडून वसूल केला 30 कोटी रुपयांचा दंड

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बीएमसीकडून वसूल करण्यात येतो 200 रुपये दंड

कोरोना संक्रमणात मुंबईच्या स्थानिक स्वराज संस्थेने गेल्या वर्षी एप्रिलपासून आतापर्यंत सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्या 15 लाख लोकांकडून 30 कोटी रुपये दंड वसूल केले आहे. बृन्हमुंबई महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे की, गेल्या सोमवारी 13,008 लोकांना पकडण्यात आले असून त्यांच्याकडून 26,01,600 रूपये दंड आकारण्यात आला आहे.

महानगरपालिकेने एप्रिल 2020 पासून यावर्षीच्या 15 फ्रेबुवारीपर्यंत 15,16,398 लोकांना सार्वजनिक ठिकाणावर विना मास्क पकडून त्यांच्याकडून 30,69,09,800 रूपयाचा दंड वसूल केला.

मुंबईत पॉझिटिव्हिटी रेट 4.50%

मुंबईत गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे 721 नवीन प्रकरण समोर आले. या आजारामुळे तीन लोकांचा मृत्यु झाला आहे. मुंबईत आतापर्यंत मृतांची संख्या 11428 आहे. सध्या मुंबईत 5,143 अॅक्टिव्ह केसेस आहेत. यात 82% लोकांवर घरीच उपचार सुरू आहेत. यामुळे सध्या हॉस्पीटलवर कोणत्याच प्रकारचे परिणात दिसत नाही आहे. यातील 18% प्रकरण हे एकट्या हाय राईज बिल्डिंग परिसरातील आहे. मात्र, शहराचा पॉझिटिव्हिटी रेट 4.50% आहे.

बीएमसीकडून वसूल करण्यात येतो 200 रुपये दंड

महाराष्ट्रात कोविड-19 संक्रमणामुळे दिवसेंदिवस रूग्ण वाढत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही चिंता वाढली आहे. मंगळवारी त्यांना लोकींना सरकारी निर्देशांचे पालन करण्यास सांगितले आहे. तसेच, वाढत्या प्रकरणामुळे मास्क वापरणे आणि सामाजिक अंतर ठेवत येणाऱ्या लॉकडाउनसाठी तयार राहण्याचे संकेत दिले आहे. महानगरपालिकेकडून सार्वजनिक ठिकाणावर विना मास्क फिरणाऱ्या लोकांकडून 200 रूपायाचा दंड वसूल करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...