आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus India: 5 Air India Pilots Test Positive For COVID 19, Had Flown Cargo Flights To China

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनला गेल्याचा परिणाम:एअर इंडियाच्या 5 वैमानिकांना कोरोना विषाणूची लागण, सर्वजण कार्गो फ्लाइटने चीनला गेले होते

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्री-फ्लाइट टेस्टमध्ये सर्व वैमानिक संक्रमित आढळले, ही चाचणी उड्डाण घेण्यापूर्वी केली जाते

एअर इंडियाच्या पाच वैमानिकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. नुकतंच हे सर्वजण कार्गो फ्लाइटने चीनला गेले होते.  उड्डाण घेण्याच्या 72 तासांपूर्वी केलेल्या प्री-फ्लाइट टेस्टमध्ये या सर्वांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली. कंपनीने सांगितले की, या सर्व वैमानिकांना सध्या मुंबईत क्वारेंटाइन करण्यात आले आहे.

एअर इंडियाने लॉकडाउननंतर अनेक कोरोना संक्रमित देशात आपले विमान पाठवले आहे. यादरम्यान 18 एप्रिलला दिल्लीवरुन ग्वांग्झोसाठी बोइंग 787 ने उड्डाण घेतली होती. एअरलाइनने शंघाई आणि हॉन्गकॉन्गसाठीही मेडिकल कार्गो उड्डाणी घेतली होती.

वैमानिक चिंतेत

एअर इंडियाकडून याबाबत सध्या स्पष्टीकरण आलेले नाही. एका सूत्राने सांगितले की, 'वंदे भारत मिशन' अंतर्गत वैमानिकांना कोरोना विषाणूचा मोठा हॉटस्पॉट असलेल्या न्यूयॉर्कसारख्या ठिकाणांवर जायचे आहे. त्यामुळे,  काही वैमानिक चिंतेत आहेत. 

चाचण्या निगेटिव्ह आल्यावर ड्यूटी करतात

उड्डाण घेतल्यानंतर वैमानिकांना हॉटेलमध्ये नेण्यात येते. तिथे ते आपल्या रिपोर्टी वाट पाहतात. रिपोर्ट येण्यासाठी 24-48 तास लागतात. त्यांची रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर कंपनी त्यांना घरी पाठवते. अरायव्हलच्या पाच दिवसानंतर क्रु मेंबरची दुसरी चाचणी केली जाते. त्यांच्या रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर परत त्यांना दुसऱ्या ठिकाणी पाठवले जाते.

दुसरी फेज 15 मे पासून सुरू होईल

'वंदे भारत मिशन'अंतर्गत भारतात येणाऱ्या नागरिकांना फ्लाइटचा आणि क्वारेंटाइनचा खर्च स्वतः भरावा लागेल. पहिल्या फेजमध्ये 14 मे पर्यंत 12 देशातून 14 हजार 800 भारतीयांना परत आणण्याचा प्लॅन आहे. मिशनची दुसरी फेज 15 मे पासून सुरू होईळ. या फेजमध्ये सेंट्रल एशिया आणि यूरोपीय देश जसे- कजाकिस्तान, उज्बेकिस्तान, रशिया, जर्मनी, स्पेन आणि थायलँडमधून भारतीयांना आणले जाईल.

बातम्या आणखी आहेत...