आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus India Cases LIVE Updates : 15,600 Infected Cases In 24 Hours, 4.56 Lakh Cases So Far,

कोरोना देश:देशातील संक्रमितांचा आकडा 4.71 लाखांवर; पश्चिम बंगालमध्ये लॉकडाउन 31 जुलैपर्यंत वाढले, ट्रेन्स आणि मेट्रोला तुर्तास रेड सिग्नल

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम बंगालमध्ये लॉकडाउन 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. राज्य सरकारने बुधवारी याबाबत घोषणा केली. सरकारकडून जारी आदेशानुसार, या लॉकडाउनदरम्यान पश्चिम बंगालमध्ये ट्रेन्स आणि मेट्रोवर बंदी असेल. पश्चिम बंगाल देशातील सर्वात जास्त कोरोना प्रभावित राज्यात सामील आहे. राज्यात आतापर्यंत 14,728 संक्रमित असून 580 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा 4 लाख 71 हजार 841 झाला असून, तसेच, आज देशभरात 410 रुग्णांचा मृत्यू झाल आहे. तर, देशातील एकूण मृतांचा आकडा 14, 894 झाला आहे. आज सर्वाधिक महाराष्ट्रात 3890 तर, त्यापाठोपाठ दिल्लीत 3788 रुग्ण सापडले. यासोबतच आज देशभरात 12 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात 1 लाख 86 हजार 584 अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू असून, 2 लाख 71 हजार 255 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  सध्या देशातील कोरोनाचा रिकव्हरी रेटदेखील 6% वाढून 56.38% झाला आहे. ही अकडेवारी covid19india.org नुसार आहे.

देशभरात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असताना एक दिलासादायक बातमीही समोर आली आहे. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, भारतात लोकसंख्या जास्त असूनही प्रति लाख कोरोना रुग्णांची संख्या सर्वात कमी आहे. जगात प्रति लाख 116.67 प्रकरणं आहे. मात्र भारतात यांची संख्या 32.04 प्रति लाख आहे. सर्वात जास्त वाईट परिस्थिती अमेरिकेत आहे. येथे प्रति एक लाखांची लोकसंख्येवर 722 कोरोना रुग्ण समोर आले आहेत. स्पेन 627 आणि ब्राजिलमध्ये हा आकडा 524 एवढा आहे.

बातम्या आणखी आहेत...