आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases : Decrease In Positivity Rate In 20 States, Less Than 5% In 4 States

महामारीदरम्यान शुभ संकेत:20 राज्यांत पॉझिटिव्हिटी रेटमध्ये घट, 4 राज्यांमध्ये हा आकडा 5% पेक्षाही कमी; पुढच्या आठवड्यापासून बाजारात येऊ शकते रशियन व्हॅक्सीन स्पुतनिक

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुढच्या आठवड्यापासून बाजारात येऊ शकते स्पुतनिक

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये घट झाली आहे. 20 राज्यांसह 187 जिल्ह्यांमध्ये गेल्या 2 आठवड्यांपासून रुग्णांमध्ये घट होत असल्याचे दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी याविषयी माहिती दिली आहे.

अग्रवाल यांनी गुरुवारी सांगितले की, 24 राज्य असे आहेत जेथे 15% पेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट आहे. 5% ते 15% दरम्यान केस येणारे 8 राज्य आहेत, तर 4 राज्य असे आहेत जेथे 5% पेक्षाही कमी पॉझिटिव्हिटी रेट आहे. अग्रवाल यांनी सांगितले की, नवीन रुग्णांमध्ये सातत्याने घट होत असल्याचे दिसत आहे. हे एक चांगले वृत्त आहे.

पुढच्या आठवड्यापासून बाजारात येऊ शकते स्पुतनिक
नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी सांगितले की, रशियाची स्पुतनिक व्हॅक्सीन पुढच्या आठवड्यापासून बाजारात येण्याची शक्यता आहे. रशियाहून पुरवठा कमी होता, पुढच्या आठवड्यात हा पुरवठा वाढेल. पॉल यांनी म्हटले की, देशभरात गुरुवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या आकड्यांनुसार, व्हॅक्सीनचे 17.72 डोस आतापर्यंत देण्यात आले आहेत. अमेरिकेमध्ये हा आकडा जवळपास 26 कोटी आहे. दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे.

गेल्या 24 तासांमध्ये किरकोळ वाढ झाली. बुधवारी 3 लाख 62 हजार 632 नवीन रुग्ण आढळले. तर 3 लाख 52 हजार 5 लोक बरे झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून 3.50 लाखांपेक्षा कमी रुग्ण समोर येत होते आणि यापेक्षा जास्त बरे होत होते. काल देशात 4,128 जणांचा मृत्यूही झाला. हा सलग दुसरा दिवस होता. जेव्हा 4 हजारांपेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...