आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus India Lockdown 5 Today Latest News Updates | What Will Happen After May 31, Goa Chief Minister Pramod Sawant To Amit Shah

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

31 मे नंतर काय?:लॉकडाउन आणखी 15 दिवस वाढण्याची शक्यता, अनेक राज्ये लॉकडाउन वाढवण्याच्या बाजुने

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाउनच्या चौथ्या फेजमध्ये सूट मिळाली, त्यामुळे 60% लोक खुश नाहीत- सर्वे

गृहमंत्री अमित शाहंनी शुक्रवारी पंतप्रधान मोदींसोबत लॉकडाउनवर चर्चा केली. शाह यांनी गुरुवारी सर्व मुख्यमंत्र्यांसोबत लॉकडाउन वाढण्याबाबत चर्चा केली होती. यानंतर सर्व मुख्यमंत्र्यांचे मत शाह यांनी पंतप्रधानांना सांगितले. सरकार 31 मे रोजी संपणाऱ्या चौथ्या लॉकडाउला सध्या असलेल्या नियम व अटीसोबत आणकी 15 दिवस वाढवू शकते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनेक राज्य लॉकडाउन वाढवण्याच्या बाजुने आहेत.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अमित शाहंसोबत झालेल्या चर्चेनंतर म्हणाले की, देशात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, त्याला आळा घालण्यासाठी लॉकडाउन वाढवण्याशिवाय पर्याय नाही.

सावंत म्हणाले की, आम्ही गोव्यात रेस्तरॉ, हॉटेल, मॉल आणि जिमला सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे पालन करत, उघडण्याची परवानगी मागणार आहोत. आम्ही केंद्रीय गृह मंत्रालयाकडे आमच्या मागण्या मांडणार आहोतत. 31 मे नंतर काय होईल, याबाबत गृह मंत्रालय उद्या गाईडलाइन जारी करू शकतात.

चौथ्या फेजमध्ये कँटॉन्मेट झोन व्यतिरिक्त दुकाने उघडण्याची परवानगी

देशात लॉकडाउनची चौथी फेज 18 मे रोजी सुरू झाली होत, ती आता 31 मे रोजी संपणार आहे. या चौथ्या फेजमध्ये मोठी सूट दिली होती. पहिल्यांदाचा कँटॉन्मेट झोन व्यतिर्कीत दुकाने आणि बाजार उघडण्याची परवानगी दिली होती. या दरम्यान सरकारने 25 मे पासून देशांतर्गत उड्डाणे सुरू केली.

चौथ्या फेजमध्ये मिळालेल्या सवलतीमुळे 60% लोक नाखुश

एका लोकेशन बेस्ड अॅपच्या सर्वेमधून समोर आले आहे की, 300 जिल्ह्यातील 2.5 लाख लोकांमधील 86% लोकांननी सांगितले की, लॉकडाउनची तिसरी फेज संपल्यानंतरही त्यांना बाहेर जाऊन खाता-पिता आले नाही. चौथ्या फेजमध्ये दिलेल्या सवलतीमुळे 60% लोक नाखुश आहेत. 49% लोकांमध्ये कोरोनाची भीती आहे. 11% लोकांचे म्हणने आहे की, देशातील संक्रमितांची संख्या पाच लाखांच्या पुढे जाऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...