आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
11 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. यात व्हॅक्सीनेशन ड्राइव्ह आणि राज्यांना लागणाऱ्या मदतीबाबत चर्चा होईल. 4 जानेवारीला केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले होते की, देशभरात दहा दिवसांच्या आत लसीकरणाला सुरुवात होईल. आशा केली जात आहे की, मकर संक्रांती म्हणजेच, 14 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात केली जाईल. पहिल्या फेजमध्ये 3 कोटी आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाइन वर्कर्स आणि हाय रिस्क असलेल्या लोकांना लस दिली जाईल. यासाठी देशभरात व्हॅक्सीनेशचा ड्राय रन करण्यात आला आहे.
दरम्यान, डायरेक्टर जनरल सिवील एविएशन (DGCA) ने व्हॅक्सीनच्या ट्रांसपोर्टेशनसाठी गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. यानुसार व्हॅक्सीन ड्राय आइसमध्ये बंद करुन विमानातून देशभरात वितरीत केली जाईल.
भारत बायोटेकने नेजलच्या फेज-1 ट्रायलती मंजुरी मागितली
कोरोना व्हॅक्सीनबाबत भारतासाठी अजून एक चांगली बातमी आहे. भारत बायोटेकने देशात नेजल व्हॅक्सीनच्या फेज-1 ट्रायलच्या मंजुरीसाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ला प्रस्ताव पाठवला आहे. भारत बायोटेक कोरोनावरील कोव्हॅक्सिन तयार करत आहे.
16 राज्यांमधील 98% रुग्ण ठीक झाले
देशात मागील 24 तासात 18 हजार 94 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 20 हजार 532 ठीक झाले असून, 233 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता एकूण 2.22 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 16 राज्यांमधील 98% रुग्ण ठीक झाले आहेत. परंतू, मध्यप्रदेश, छत्तीसगड, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, केरळ, सिक्किम आणि उत्तराखंडमध्ये देशभरातील ठीक होणाऱ्या रुग्णांपेक्षा (96.4%) कमी आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.