आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus India Situation Latest Update; Health Ministry's Joint Secretary, Lav Agarwal Press Briefing​ Today

कोरोनाविषयी दिलासादायक बातमी:जगात कुठेही बालकांमध्ये गंभीर संक्रमण नाही, पुढच्या लाटेतही असे होईल याचा पुरावा नाही

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिकव्हरी रेट 94.3%, अॅक्टिव्ह प्रकरणे कमी होऊन 13 लाख झाले

देशात कोरोनाची दुसरी लाट कमकुवत होत असल्याने नवीन रुग्णांमध्ये सातत्याने घट होत आहे. तिसऱ्या लाटेमध्ये बालकांवर वाईट परीणाम होण्याच्या वृत्तादरम्यान सरकारने दिलासादायक दावा केला आहे. एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी मंगळवारी सांगितले की, भारत किंवा जगातील प्रकरणे पाहिले तर आतापर्यंत असा कोणताही डेटा आलेला नाही, ज्यामध्ये सांगितले असेल की, मुलांमध्ये आता जास्त गंभीर संक्रमण आहे. पुढची लाट आली तर बालकांवर गंभीर परीणाम होतील असा कोणताही पुरावा नाही. कोरोना परिस्थितीवर होत असलेल्या नेहमीच्या पत्रकार परीषदेत ते बोलत होते.

रिकव्हरी रेट 94.3%, अॅक्टिव्ह प्रकरणे कमी होऊन 13 लाख झाले
आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव, लव अग्रवाल म्हणाले की, देशातील सक्रिय प्रकरणे 13 लाखांवर आली आहेत. होम आयसोलेशन आणि हॉस्पिटल मिळून रिकव्हरी रेट 94.3% झाला आहे. 1 ते 7 जूनपर्यंत पॉझिटिव्हिटी रेटमध्ये 6.3% ची घट झाली आहे. त्यांनी म्हटले की, 7 मे रोजी देशात एका दिवसात 4.14 लाख नवीन केस नोंदवण्यात आल्या. आता या एक लाखांपेक्षाही कमी झाल्या आहेत.

सरकारनुसार, भारतात प्रत्येकी 10 लाख लोकसंख्येमागे 20,822 केस आल्या आहेत. 252 लोकांचा मृत्यू झाला आहे. हे जगात सर्वात कमी आहे.

एका आठवड्यात नवीन केसमध्ये 33% घट
या व्यतिरिक्त गेल्या 24 तासांमध्ये देशात 86,498 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. हे 3 एप्रिलनंतर आतापर्यंत एका दिवसात सर्वात कमी प्रकरणे आहेत. 4 मे रोजी 531 असे जिल्हे होते, जेथे रोज 100 पेक्षा जास्त प्रकरणे नोंदवण्यात येत होते. असे आता 209 जिल्हे राहिले आहेत. गेल्या एका आठवड्यात नवीन केसमध्ये 33% आणि अॅक्टिव्ह केसमध्ये 65% घट झाली आहे. आता 15 राज्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 5% नी कमी झाला आहे.

व्हक्सीनेशन ड्राइव्हवर दिर्घ एनालिसिसनंतर निर्णय
प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये निती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांना प्रश्न करण्यात आला की, व्हॅक्सीन पॉलिसीवर निर्णय सुप्रीम कोर्टाच्या टीकेनंतर घेण्यात आला का? यावर त्यांनी म्हटले की, आम्ही सुप्रीम कोर्टाच्या चिंतेचा सन्मान करतो. मात्र सरकार डी-सेंट्रलाइजेशनच्या मॉडलला लागू करेल्यानंतर एक मेपासून समिक्षा करत होते. असे निर्णय काही कालावधीनंतर विश्लेषण आणि विचारविनिमयानंतर घेतले जातात.

बातम्या आणखी आहेत...