आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus India Situation,Coronavirus Health Ministry Lav Aggarwal And ICMR Press Conference Today Latest News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनावर सरकार:भारतात दर 24 चाचण्यानंतर एक पॉझिटिव्ह रुग्ण मिळत आहे, याबाबतीत भारत अनेक देशांच्या पुढे; 325 जिल्ह्यात एकही संक्रमित नाही

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयसीएमआरने सांगितले- देशाला मिळाले 5 लाख रॅपिड अँटीबॉडी टेस्टिंग किट, कंटेनमेंट परिसरात चाचण्यास सुरू होणार
  • केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव म्हणाले- सर्वच हॉस्पीटल्समध्ये गंभीर आजारांवरील उपचार सरुच राहतील

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गुरुवारी केंद्रीय मंत्रालयांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ने कमी चाचण्या होत असल्याच्या आरोपांचे खंडन केले. काउंसिलचे प्रतिनिधी म्हणाले की, देशात सध्या गरजेनुसार टेस्टींग होत आहेत. ही क्षमता वाढवण्यावर काम सुरू आहे. त्यांनी यावेळी सांगितले की, भारतात कोरोना संक्रमणाचा वेग इतर देशांपेक्षा कमी आहे. जापानमध्ये 11.7, इटलीमध्ये 6.7, अमेरिकेत 5.3 आणि ब्रिटेनमध्ये 3.4 लोकांमागे एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहे. पण, भारतात दर 24 रुग्णांमागे एक संक्रमित रुग्ण मिळत आहे. त्यामुळे भारताची परिस्थिती सध्या इतर देशांपेक्षा खूप चांगली आहे.

आयसीएमआरच्या प्रतिनिधीने सांगितले की, देशाला 5 लाख रॅपिड अँटीबॉडी टेस्टिंग किट गुरुवारी चीनकडून मिळाले आहेत. आता या किटमुळे देशातील जास्त कोरोनाग्रस्त असलेल्या भागांमध्ये चाचण्या केल्या जातील. आयसीएमआरचे विशेषज्ञ म्हणाले की, ''या किटमुळे तुम्हाला कोरोना झाला की, नाही याची योग्य आणि जलद गतीने चाचणी होईल. जेव्हा तुम्ही एकादा व्हायरस किंवा पॅथोजनच्या संपर्कात येतात, तेव्हा तो तुमच्या शरिरात अँटीबॉडी बनवतो. या टेस्कमध्ये याच अँटीबॉडीची माहिती मिळेल. या टेस्टमध्ये बोटामार्फत एक-दोन थेंब ब्लड सँपल्स घेऊन त्यात आयजीजी अँटीबॉडी शोधण्यात येतील. यामुळे कोरोना झालेले आणि ज्यांचा कोरोना आपोआप ठीक झाला, अशा रुग्णांची ओळख पटेल.

325 जिल्ह्यामध्ये अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण नाही

आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवालने सांगितले की, देशात कोरोनाशी सामना करण्यासाठी कंफेडरेशन ऑफ इंडियासोबत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची बैठक झालील. यात ठरले की, कोरोनाशी सामना करण्यासाठी मेक इन इंडियाचा उपयोग घेतला जाईल. या मार्फत देशात आरोग्य उपकरणे बनवली जातील. त्यांनी यावेळी सांगितले की, देशात 325 जिल्ह्यांमध्ये अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही.

बातम्या आणखी आहेत...