आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Indore :Knife Attack On Health Department Suvery Team In Indore Vinoba Nagar Of Palasia Station News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना वॉरियर्ससोबत गैरवर्तन:इंदूरमध्ये सर्वे करणाऱ्या महिला शिक्षकेवर हल्ला करण्याचा प्रयत्न, मोबाइल तोडला; चाकू हल्ल्यात अन्य 3 जखमी

इंदूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • इंदूरमध्ये कोरोना योद्ध्यांवर 15 दिवसांत तिसऱ्यांदा हल्ला केल्याची घटना

आपला जीव वाचण्यासाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावत ड्युटी करणाऱ्या इंदूरच्या कोरोना योद्ध्यांवर 15 दिवसांत तिसऱ्यांदा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी येथील पलासिया भागातील विनोबा नगरमध्ये एका गावगुंडाने आरोग्य विभागाच्या पथकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कोरोना विषयी सर्वेक्षण करण्यासाठी तीन महिला कामगारांची टीम पोहोचली होती. आरोपीने एका महिला कर्मचाऱ्याला धक्का दिला आणि मोबाइलही फोडला. यानंतर शेजारी राहणाऱ्या लोकांवर चाकूने हल्ला केला. यामध्ये तीन ते चार लोक जखमी झाले आहे. आरोपी या भागात कच्ची दारूचू विक्री करत असल्याचा आरोप शेजाऱ्यांनी केला आहे. 

आरोग्य विभागाचे सर्व्हे प्रभारी डॉ प्रवीण चौरे यांचा असा दावा आहे की गुन्हेगार पारसने सर्वेक्षण पथकावर हल्ला केला. आरोपी लॉकडाउन दरम्यान दारू विक्री करत होता. त्याच्यावर गांजा विक्रीचा देखील आरोप आहे. शुक्रवारी रात्री या प्रकरणांवरून त्याचा शेजाऱ्यांसोबत वाद झाला. शनिवारी सकाळीही तणावाचे वातावरण होते. या दरम्यान सर्वे टीम तेथे पोहोचली असता आरोपीने त्यांच्यावर हल्ला केला. सर्वे टीमला मोबाइलवर डाटा एंट्री करावी लागते. एक महिला शिक्षिका मोबाइलवर डेटा अपडेट करत होती. मात्र महिला कोणाला तरी तक्रार करत असल्याचे आरोपीला वाटले. त्याने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यावेळी महिला कर्मचारी बाजूला सरकली. यानंतर आरोपीने महिलेचा मोबाइल हिसकावला आणि जमिनीवर आपटला. यानंतर आरोपीने शेजाऱ्यांवरही हल्ला केला. या घटनेत महिला कर्मचाऱ्यांसह चार लोक जखमी झाले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...