आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Infection Data Updates Today; Cases And Deaths In India To Union Health Ministry Says The Positivity Rate Has Come Down In The Country And Covid 19 Infection In Children Latest News And Updates Today

व्हायरसचा बालकांवर परीणाम:सरकारने म्हटले - बालकांमध्ये कोरोनाचे संक्रमण गंभीर असत नाही, मात्र व्हायरसने आपले रुप बदलले तर वाढू शकते इन्फेक्शन

नवी दिल्ली19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोवीशील्डचे दोनच डोस लागणार, एक नाही

केंद्र सरकारने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परीणाम बालकांवर होण्याच्या शक्यतेच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. देशातील कोरोना परिस्थितीवर मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर निती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी म्हटले की, बालकांमध्ये कोरोनाचा आजार गंभीर असत नाही, मात्र व्हायरसने आपले रुप बदलले तर इन्फेक्शन वाढू शकते. याच पार्श्वभूमीवर तयारी केली जात आहे. या विषयावर एक्सपर्ट्सचा ग्रुप बनवण्यात आला आहे. डेटा आणि अनुभव पाहता गाइडलाइंस तयार केल्या जात आहेत.

त्यांनी म्हटले की, मुलांमध्ये जो कोविड असतो त्याचे दोन रुप असतात. ताप आला, निमोनिया झाला आणि मुलांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यात असे आढळून आले की, कोविड आला, गेला आणि याची माहितीही मिळाली नाही. कोविडमधून रिकव्हर झाल्यानंतर दिसले की, काही दिवसांनंतर रॅशेज येत आहेत. निमोनियाही झाला. अशा प्रकारचे लक्षणे दिसत आहेत. डेटावरुन कळाले की, कमी संख्येत मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. त्यांनी सांगितले की, मुलांसाठी व्हॅक्सीन ट्रायल सुरू आहे.

कोवीशील्डचे दोनच डोस लागणार, एक नाही
लसीकरणाच्या पॉलिसीवर सरकारने स्पष्ट सांगितले आहे की, देशात कोवीशील्डचे 2 डोस देण्याचा नियम आहे. हाच नियम आहे, याच कोणतेही कंफ्यूजन नसायला हवे. कोवीशील्डचा पहिला डोस देण्याच्या 12 आठवड्यानंतर दुसरा डोस दिला जाईल. कोवीशील्डचे दोनस डोसच दिले जातील, एक नाही. कोव्हॅक्सीनचेही हेच शेड्यूल आहे. जोपर्यंत वैज्ञानिकरित्या सिद्ध होत नाही, लसीचे डोस एक करण्याच प्रश्नच उपस्थित होत नाही आणि असे केलेही जाणार नाही.

सरकारनुसार, व्हॅक्सीन मिक्स करण्यावर इंटरनॅशनल रिसर्च सुरू आहे. याचा पॉझिटिव्ह परीणाम होण्याची शक्यता आहे. मात्र यामुळे नुकसान होण्याची शक्यताही टाळता येणार नाही. हा एक न सुटलेला वैज्ञानिक प्रश्न आहे, विज्ञान याला सोडवेल. लसीच्या मिक्सिंगचा सध्या प्रोटोकॉल नाही. सध्या दोन्ही डोस एकाच लसीचे (कोवीशील्ड आणि कोव्हॅक्सिन) चे दिले जाणार आहेत. या प्रकरणावर SOP वर कायम राहा.

बातम्या आणखी आहेत...