आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Lawyers Death Compensation; Supreme Court Dismisses PIL And Impose Fine

कोविड भरपाईच्या मागणीवर SC:सर्वोच्च न्यायालयाने वकिलाला सांगितले - तुमचे जीवन इतरांपेक्षा अधिक मौल्यवान नाही; ही जनहित याचिका नाही, ती प्रसिद्धी हित याचिका आहे

नवी दिल्ली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वकील प्रदीप कुमार यादव यांनी ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती

कोविडमध्ये मृत्युमुखी पडलेल्या वकिलांच्या कुटुंबियांना भरपाई मिळावी या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने कठोर टिप्पणी केली. कोर्टाने याचिका दाखल करणाऱ्या वकिलाला सांगितले की, तुमचे जीवन इतरांच्या जीवांपेक्षा जास्त मौल्यवान नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला वेगळी वागणूक देऊ शकत नाही. सुप्रीम कोर्टाने वकिलाला 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावला.

वकील प्रदीप कुमार यादव यांनी ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. यादव यांनी याचिकेत म्हटले होते की, 60 वर्षापेक्षा कमी वयाच्या त्या वकिलांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची भरपाई देण्यात यावी, ज्यांनी कोरोना संसर्गामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपला जीव गमावला आहे. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती बी.व्ही.नागरथना यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी केली.

न्यायालयाच्या 3 कठोर टिप्पण्या
1. अशा याचिका थांबवण्यासाठी पावले उचलतील

ही जनहिताची याचिका नसून प्रसिद्धी हिताची याचिका आहे. यावर, वकील यादव म्हणाले की मी ही याचिका मागे घेतो आणि पुढील याचिका चांगल्या आधारावर दाखल करेन. यावर न्यायालयाने 10 हजारांचा दंड ठोठावला आणि म्हटले की भविष्यात वकिलांनी अशा याचिका दाखल करू नयेत, यासाठी आम्ही त्वरित पावले उचलू.

2. बऱ्याच लोकांनी आपले प्राण गमावले, तुम्ही अपवाद नाही
आम्ही तुम्हाला अपवाद मानू शकत नाही. कोविडमुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. वकीलाचे आयुष्य इतरांपेक्षा अधिक मौल्यवान असू शकत नाही. ज्या लोकांनी कोरोनामुळे प्राण गगमावले आहे, त्या सर्व लोकांच्या भरपाईबद्दल आम्ही आधीच बोललो आहोत.

3. समाजातील इतर लोक महत्वाचे नाहीत का?
समाजातील इतर लोक महत्त्वाचे नाहीत का? ही याचिका कट-कॉपी-पेस्ट पद्धतीने करण्यात आली आहे. असे होणार नाही की, वकील अशा याचिका दाखल करतील आणि नुकसानभरपाईची मागणी करतील. आम्ही हे करण्याची परवानगी देत नाही.

बातम्या आणखी आहेत...