आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Lifetime Ban On Travel News; COVID Rules Not Strictly Followed By Alliance Air, Air Asia And IndiGo Passengers

कोरोना काळात विमान कंपन्यांचा मोठा निर्णय:नियम मोडणाऱ्या प्रवाशांवर होऊ शकते कारवाई, लागू शकतो परमानंट बॅन

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मास्क आणि PPE किट घालण्यास नकार दिल्यावर अलायंस एअर, एअर एशिया आणि इंडिगोने 8 प्रवाशांना विमानातून खाली उतरवले

कोरोना रुग्णांच्या संख्येत होणाऱ्या वाढीच्या पार्श्वभूमीवर विमान कंपन्या कडक नियमांचे पालन करताना दिसत आहेत. नुकत्याच विविध ठिकाणी झालेल्या घटनेमध्ये 8 प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आले. यातील काही प्रकरणात सुरक्षा रक्षकांना बोलवण्यात आले. या सर्व प्रवाशांनी मास्क आणि पीपीई किट घालण्यास नकार दिला होता.

बुधवारी इंडिगो दिल्लीवरुन हैदराबादला जाणाऱ्या विमानात एका महिलेने मास्क घालण्यास नकार दिला होता. दुसरे एक विमान दिल्लीवरुन गोवाकडे जात होते. यातही एका प्रवाशांना मास्क घालण्यास नकार दिला होता. यानंतर इंडिगोने या दोन्ही प्रवाशांना लँडींग झाल्यावर सुरक्षा रक्षकाच्या स्वाधिन केले होते. विमान कंपनीने या प्रकरणी पोलिसांत तक्रार केली होती.

एका आठवड्यात आठ घटना

मागील एका आठवड्यात 3 विमान कंपन्यांमध्ये अशा प्रकारच्या आठ घटना घडल्या आहेत. 15 मार्चला एअर एशिया इंडियाने अशाच घटनेत दोन प्रवाशांना विमानातून खाली उतरवले होते. या प्रवाशांनी पीपीई कीट घालण्यास नकार दिला होता.

सप्टेंबरमध्ये 9 जणांवर ट्रॅव्हल बॅन लावला होता

मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये इंडिगोने 9 प्रवाशांवर 15 दिवसांचा बॅन लावला होता. हे सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे कर्मचारी होते. या सर्वांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे आणि मास्क घालण्यास नकार दिला होता. हे सर्व 9 सप्टेंबरला कंगना रनोटच्या चंडीगड-मुंबई प्रवासाला कव्हर करण्यासाठी आले होते.

नियम मोडणाऱ्यांवर आजीवन प्रवासाची बंदी

DGCA च्या नियमानुसार, नियम मोडणाऱ्यांवर दोन वर्षांची प्रवास बंदी लावली जाऊ शकते. शनिवारी DGCA ने सर्व विमान कंपन्यांना याप्रकारचे आदेश दिले आहेत. आदेशनुसार, अनेकवेळा सांगूनही प्रवासी नियमांचे पालन करत नसेल, तर त्याच्यावर तीन महिन्यापासून आजीवन प्रवास बंदी लावली जाऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...