आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Lockdown Ramadan 2020 Latest News Update; Mukhtar Abbas Naqvi, Kazi Maulana Khalid Rasheed Firangi Mahali

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाउनमध्ये रमजान:24 एप्रिलपासून रमजान झाल्यावर 10 दिवस लॉकडाउनमध्ये जातील, मुस्लिमांना अॅडवायजरी- 'घरात राहुनच नमाज अदा करावी'

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • इस्लामिक सेंटर ऑफ इंडियाच्या अॅडवायजरीमध्ये म्हटले- इफ्तारच्या दावतला लागणाऱ्या पैशातून गरीबांना मदत करा

देशभरातील 21 दिवसांचा लॉकडाउन वाढून आता 3मे पर्यंत करण्यात आला आहे. अशात 23 एप्रिलच्या रात्री चंद्र दिसल्यास 24 एप्रिलपासून रमजान सुरू होईल. 24 एप्रिलपासून 3 मेपर्यंत, म्हणजेच रमजानचे सुरुवातीचे 10 दिवस लॉकडाउनमध्येच जातील. मुस्लिम समाजातील लोक मशिदीत जाऊ शकणार नाहीत. त्यांना आपापल्या घरातच नमाज आणि इफ्तार करावे लागेल. रमजानमध्ये अदा केली जाणारी विशेष नमाज तरावीह देखील मशिदीत होणार नाही.

इस्लामिक सेंटर ऑफ इंडियाचे चेयरमन आणि लखनऊ शहराचे काजी मौलाना खालिद रशीद फिरंगी महली यांनी मुसलमानांसाठी अॅडवायजरी जारी केली आहे. त्यांनी म्हटले की, रमजानमध्ये लॉकडाउनचे पालन करा आणि या महामारीपासून वाचण्यासाठी अल्लाकडे दुवा मागा. रमजानमध्ये लोकांनी तरावीहची नमाज अदा करावी, पण मशिदीत एकापेक्षा जास्त लोकांनी जमा होऊ नये. आपापल्या घरातूनच नमाज अदा करून इफ्तार करावी.

मौलानाची अपील- कोणीच उपाशी राहू नये

मौलाना खालिद रशीद फिरंगी महलीने म्हटले की, रमजानच्या महिन्यात जे लोक मशिदीत इफ्तारी पाठवतात, त्यांनी यावर्षी मशिदीत न पाठवता, गरिबांना द्यावी. रमजानमध्ये इफ्तार पार्टी करणाऱ्यांनी या पैशांनी गरिबांना मदत करावी. या महिन्यात कोणीच उपाशी पोटी राहू नये, अशी सर्वांनी खबरदारी घ्यावी.

बातम्या आणखी आहेत...