आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Lockdown Women Reached The Village Of Bundelkhand After Walking Hundreds Of Kilometers

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशाचा आँखो देखा हाल:शेकडो मैल पायपीट केलेल्या महिलांच्या पायांवर फोड, बुरसट चालीरीतींनी चप्पलही हिरावली

बंुदेलखंडहून (धर्मेंद्रसिंह भदौरिया)10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
टपरनमधील प्रत्येक घर आपल्या धान्याचा एक वाटा मजुरांसाठी धान्य बँकेत देत आहे. छाया : ओपी सोनी - Divya Marathi
टपरनमधील प्रत्येक घर आपल्या धान्याचा एक वाटा मजुरांसाठी धान्य बँकेत देत आहे. छाया : ओपी सोनी
  • कोरोनाचे दुष्टचक्र फुलबतीने सहन केले. आता वाईट चालीरीतींवर तिचे मौन आहे

ललितपूरहून सुमारे ४० किमी दूर हनौता गाव. ४५ अंश तापमानात भरदुपारी तप्त मातीवर अनवाणी उभी फुलबती आम्हाला आपबीती सांगत होती. इंदूरहून २० दिवसांपूर्वी ती परतली. ललितपूरहून तिला पायी यावे लागले. पायाला फोड आले होते. मात्र, गाव जवळ आले म्हणून तिने हे सहन केले. तेव्हा पायात चप्पलही होती. परंतु गावात येताच तिला चप्पल सोडावी लागली. कारण, येथे गावातील महिलांना चप्पल घालायची परवानगी नाही. फुलबती म्हणते, “चप्पल आहे, मात्र सासरी पुरुषांसमोर आम्ही चप्पल घालत नाही.’ गावातील ४५ वर्षीय विक्रम मध्येच सांगतात, “मरदन की इज्जत करती है, बाके मारे चप्पल नाईं पहरती...’ कोरोनाचे दुष्टचक्र फुलबतीने सहन केले. आता वाईट चालीरीतींवर तिचे मौन आहे. परमार्थ सेवा संस्थेचे संजय सिंह म्हणतात, “ललितपूर जिल्हा आणि झाशीच्या बबिना तहसील भागांत आदिवासीबहुल गावांमध्ये आजही ही प्रथा सुरू आहे.’

लॉकडाऊनदरम्यान मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या बुंदेलखंडमध्ये ९ लाखांहून अधिक मजूर-कामगार परतले. बुंदेलखंडचे जाणकार रघू ठाकूर म्हणतात, “या भागात गेल्या २० वर्षांत १३ वर्षे दुष्काळ होता. यादरम्यान सर्वाधिक स्थलांतर झाले. अजूनही ही स्थिती सुधारलेली नाही. ज्या पोटासाठी हे लोक गावाबाहेर पडले त्याच पोटासाठी ते आता परत येत आहेत.’ अर्थात, गावे त्यांना मदत करत आहेत. 

ललितपूरच्या आदिवासीबहुल टपरन गावातील महिलांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी धान्य बँक तयार केली. एप्रिलपासून आजवर यात ११ क्विंटल ६० किलो गहू जमा झाला. गावातील प्रत्येक कुटुंब उत्पन्नातील एक भाग या बँकेत‌‌‌ ठेवते. इंदूरहून परतलेले नौनेलाल यांना बँकेतून पाच पैली (पितळाचे भांडे, यात १० किलो धान्य बसते) गहू दिला. नौनेलाल म्हणतात, वीटभट्टीवर काम करून ते सहा जणांचे कुटुंब चालवत. गावात परतल्यावर खाण्यासाठी काहीच नव्हते. आता मदत मिळाली. परंतु, ही किती दिवस मिळेल, हीच बहुतांश लोकांना चिंता आहे. सरपंच जयदेवसिंह बुंदेला सांगताता, “गावात ५९० मजूर परतले आहेत. त्यांना तलावाच्या खोलीकरणाच्या कामाला लावले. आम्ही १९० रुपये मजुरी देतो. शहरात त्यांना रोज ४०० रुपये मिळत. त्यामुळे बहुतेक मजुरांना या कामात रस नाही.’

गावात मजुरांना रोजगार देणे हे मोठे आव्हान आहे. सागरचे प्रोफेसर दिवाकरसिंह राजपूत म्हणतात, बुंदेलखंडमध्ये दरडोई उत्पन्न देशाच्या सरासरीपेक्षा एक चतुर्थांश आहे. येथे िवडी उद्योग होता मात्र त्याची स्थिती वाईट आहे. गेल्या १० वर्षांत ६० टक्के व्यवसाय कमी झाला. येथे चार लाखाहून अधिक तेंदुपत्ता तोडणारे आणि मजूर आहेत. छतरपूरच्या विडी कॉलनीतील महिला पाना म्हणते, तीन दिवसांत १५०० विड्या तयार करावयाच्या आहेत. यासाठी मिळतात केवळ १८० रुपये. ठेकेदार ३५० ग्रॅम तंबाखू देतो. विड्या तयार करताना यापेक्षा अधिक तंबाखू लागली तर पैसे कापून घेतले जातात. लॉकडाऊनमध्ये २२ मार्चपासून विडी तयार करणे बंदच आहे. ७ जूनपासून काही ठिकाणी काम सुरू झाले आहे. बुंदेलखंडमध्ये सागर भागात २३० हून अधिक कोरोना रुग्ण आहेत. उर्वरित जिल्ह्यात ५० हून अधिक रुग्ण कोठेच नाहीत. येथे मजुरांसाठी कोरोनापेक्षा दोन वेळच्या भाकरीसाठी संघर्ष आहे.

बातम्या आणखी आहेत...