आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आशियातील पहिला कोरोना लंग्स ट्रांसप्लांट:दिल्लीतील रुग्णाचे चेन्नईत लंग्स ट्रांसप्लांट, कोरोना संक्रमणामुळे दोन्ही फुफ्फुसे झाली होती खराब

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 8 जूनला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आली होती, रुग्णाला श्वास घ्यायला त्रास सुरू झाला होता

चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात 48 वर्षीय कोरोना संक्रमित रुग्णाचे डबल लंग ट्रांसप्लांट यशस्वीरित्या पूर्ण झाले. कोरोना संक्रमणामुळे रुग्णाचे दोन्ही फुफ्फुसे खराब झाली होती. प्रकृती जास्त बिघडल्यामुळे रुग्णाला गाझियाबादवरुन चेन्नईतील एमजीएच हेल्थकेअर हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले. या ठिकाणी त्याच्या दोन्ही फुफ्फुसांचे ट्रांसप्लांट करण्यात आले. कोरोना संक्रमित रुग्णाच्या लंग ट्रासप्लांटचे हे आशियातील पहिलेच प्रकरण आहे.

एमजीएच हेल्थकेअर हॉस्पीटलने सांगितले की, रुग्ण दिल्लीचा आहे. 8 जूनला त्याची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यावेळी त्याच्या फुफ्फुसाचा एक लहानसा भाग काम करत होता. परंतू, कोरोना संक्रमणामुळे त्याच्या फुफ्फुसांमधील संक्रमण वाढले आणि अखेर त्याला ट्रांसप्लांट करावा लागला.

दोन्ही फुफ्फुसे चांगल्याप्रकारे काम करत आहेत

हॉस्पिटलचे चेअरमन आणि हॉर्ट-लंग ट्रांसप्लांट प्रोग्रामचे हेड डॉ. के आर बालाकृष्णन यांनी सांगितले की, ट्रांसप्लांटनंतर रुग्णाची प्रकृती स्तिर आहे. आता रुग्णाची दोन्ही फुफ्फुसे चांगल्यारितीने काम करत आहेत. रुग्णाचा इक्मो सपोर्टदेखील चांगल्याप्रकारे काम करत आहे.