आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना देशात:संक्रमितांचा आकडा 5 लाखांच्या पुढे; असाममध्ये 11 तर झारखंडमध्ये 31 जुलैपर्यंत लॉकडाउन वाढवला

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील संक्रमितांचा आकडा शुक्रवारी 5 लाखांच्या पुढे गेला. आज नवीन 16,607 रुग्णांची नोंद झाली. यासोबतच देशात 5 लाख 07 हजार 795 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण झाले असून, आज 374 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण मृतांचा अकडा 15,682 झाला आहे. सध्या देशात 1,96,450 अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 2,95,608 रुग्ण कोरोनामुक्त झाले. हे आकडे covid19india.org वेबसाइटनुसार आहेत. देशात फक्त 149 दिवसात संक्रमितांनी 5 लाखांचा टप्पा पार केला आहे.

दरम्यान, डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिविल एविएशन म्हणजेच, डीजीसीएने शुक्रवारी सांगितले की, आंतरराष्ट्रीय उड्डाणे 15 जुलैपर्यंत बंदच राहतील. लॉकडाउनदरम्यान 23 मार्चला आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घातली होती. तिकडे, असामने गुवाहाटी आणि कामरूप जिल्ह्यात 14 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली आहे. हा 28 जूनपासून लागू होईल. 

0