आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus | Mumbai Delhi Coronavirus News | Coronavirus Outbreak India Cases LIVE Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Bihar Punjab Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:देशात आतापर्यंत 15 हजार 387 प्रकरणे: मृतांचा आकडा 488 वर; दिल्लीत कोरोना योद्ध्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मिळणार 1 कोटी रुपये

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तमिळनाडूत शुक्रवारी एकाच दिवशी सर्वाधिक 103 कोरोनाग्रस्त ठीक होऊन घरी पोहोचले

देशातील कोरोना संक्रमितांची संख्या 15 हजार 387 झाली आहे. शनिवारी महाराष्ट्रात 328, गुजरामध्ये 277, मध्यप्रदेशात 45, राजस्थानात 53, पश्चिम बंगालमध्ये 32, आंध्रप्रदेशात 31, हरियाणात 4, उत्तराखंड आणि मेघालयात प्रत्येकी 2 तर अंदमान-निकोबार मध्ये 1 रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ही आकडेवारी covid19india.org वेबसाइट आणि राज्य सरकारांकडून मिळालेल्या माहितीनुसार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशात 14 हजार 792 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यातील 12 हजार 289 रुग्णांवर उपाचर सुरू आहेत, 2015 रुग्ण बरे झाले आहेत. तर 488 जणांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोना योद्ध्यांच्या परिवाराला मिळणार 1 कोटींची नुकसान भरपाई, दिल्ली सरकारचा निर्णय 

दिल्ली सरकारने कोरोना ड्यूटीवरील कर्मचाऱ्यांना संसर्गाने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 1 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली. यामध्ये डॉक्टर, नर्सेस व्यतिरिक्त पोलिसकर्मचारी, शिक्षक आणि नागरी संरक्षणामधील लोकांचा यात समावेश आहे. पंजाब सरकारने देखील अशाप्रकारचा निर्णय घेतला आहे. पंजाबमध्ये ड्यूटी दरम्यान प्राण गमावलेल्या अधिकाऱ्यांच्या परिवाराला 50 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने याची पुष्टी केली आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, विविध राज्यांमध्ये आतापर्यंत 4 लाख 12 हजार 400 पीपीई किट पाठण्यात आल्या आहेत. सिंगापूर येथून 2 लाख किट लवकरच येण्याची अपेक्षा आहे. 25 लाख 82 हजार 178 एन-95 मास्क आणि 4 कोटी 28 लाख हॉड्रोक्सीक्लोरोक्वीन टॅबलेट सुद्धा पाठवण्यात आल्या आहेत.

आज गुजरातमध्ये सर्वाधिक 173 रुग्ण आढळले

शनिवारी गुजरातमध्ये 173. मध्यप्रदेशात 45, राजस्थानमध्ये 41, पश्चिम बंगालमध्ये 32, आंध्रप्रदेशात 31, तर उत्तराखंड आणि मेघालयमध्ये प्रत्येकी 2 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 

काल सर्वाधिक 273 रुग्ण बरे झाले

देशभरात शुक्रवारी सर्वाधिक 273 कोरोना संक्रमितांना रुग्णालयातून सोडण्यात आले. यामध्ये तमिळनाडूत एका दिवसात सर्वाधिक 103 रुग्ण, यानंतर इंदूरमध्ये 35 रुग्ण बरे झालेत. याशिवाय महाराष्ट्रात 31, हरियाणात 21, दिल्लीत 20 आणि राजस्थानात 19 रुग्ण बरे झाले. राजस्थानमधील कोरोनाचे मुख्य केंद्र असलेल्या भिलवाडा येथे सर्व संसर्गजन्य रुग्ण बरे झाले आहेत. या जिल्ह्यात 28 प्रकरणे समोर आली होती. तर 2 जणांचा मृत्यू झाला होता. गुरुवारी देशभरात 259 रुग्ण बरे झाले. 

कोरोना व्हायरसचे संक्रमण आतापर्यंत देशातील 27 राज्यांमध्ये पसरले आहे. तसेच 7 केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुद्धा कोरोनाचे रुग्ण आहेत. यात दिल्ली, चंदीगड, अंदमान आणि निकोबार, दादर आणि नगर हवेली, जम्मू-काश्मीर, लडाख आणि पुद्दुचेरी यांचा समावेश आहे.

गुजरातमध्ये लग्नावर कारवाई

गुजरातच्या नवसारी येथे वधू-वर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी वांकल गावातील मंदिरावर छापा टाकला. या ठिकाणी 14 लोकांच्या उपस्थितीत कुठल्याही परवानगीशिवाय विवाह लावला जात होता.

बातम्या आणखी आहेत...