आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपल्या सर्वांसाठी एक चिंतेची बातमी आहे. आंध्रप्रदेशात कोरोनाचा एक नवीन स्ट्रेन आढळून आला आहे. त्याला एपी स्ट्रॅन (AP Strain)आणि एन440के (N440K ) असे नाव देण्यात आले आहे. सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्यूक्लर बायोलॉजी (CCMB चे शास्त्रज्ञ म्हणतात की हे सध्याच्या व्हायरसपेक्षा हा स्ट्रेन 15 पट जास्त धोकादायक आहे.
या स्ट्रेनने संक्रमित रूग्ण 3-4 दिवसात हायपोक्सिया किंवा डिस्पेनियाला बळी पडतात. याचा अर्थ असा आहे की रुग्णाच्या फुफ्फुसांपर्यंत श्वास जाणे थांबते. जर योग्य वेळी उपचार आणि ऑक्सिजन सपोर्ट मिळाला नाही तर रुग्णाचा मृत्यू होतो. सध्या भारतात यामुळेच बहुतेक रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत.
कुर्नुलमध्ये आला आढळून, वेगाने पसरत आहे
शास्त्रज्ञांनुसार आंध्रप्रदेशातील कुर्नुल येथे प्रथम या स्ट्रेनची ओळख पटली. हा सामान्य लोकांमध्ये खूप लवकर पसरतो. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे चांगली प्रतिकारशक्ती असलेले लोक देखील या प्रकारासमोर अपयशी ठरत आहेत. म्हणजे ज्याची प्रतिकारशक्ती मजबूत आहे अशा लोकांनासुद्धा हा स्ट्रेन सोडत नाही. या नवीन स्ट्रेनमुळे लोकांच्या शरीरात सायटोकीन स्टॉर्मची समस्या येते.
तरूण आणि मुलांमध्ये वेगाने पसरतो
शास्त्रज्ञांनुसार हा स्ट्रेन तरूण आणि मुलांवर लवकर हावी होत आहे. तज्ञांच्या मते, जर वेळेत या स्ट्रेनची साखळी तुटली नाही तर कोरोनाची ही दुसरी लाट आणखी भयानक बनू शकते. हा सध्याचा स्ट्रेन B1617 आणि B117 पेक्षा अधिक धोकादायक आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.