आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus New Wave Alert; WHO News | World Health Organization Chief Scientist Soumya Swaminathan On COVID Variants; News And Live Updates

कोरोनावर WHO चा दावा:वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या - भारतासाठी पुढील 6 ते 18 महिने महत्त्वाचे; संसर्गाच्या नव्या लाटा येऊ शकतात

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतात आढळणारा व्हायरसचा नवीन व्हेरिएंट वेगाने पसरत आहे.

भारत देशातील कोरोना महामारीच्या वाढत्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी चिंताजनक दावा केला आहे. देशात येत्या काही दिवसांत कोरोनाची नवीन लाट येणार आहे. त्यामुळे भारतासारख्या देशांनी येणाऱ्या 6 ते 18 महिन्यांदरम्यान, केलेले प्रयत्न महत्वाचे ठरणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, कोरोनाकाळात व्हायरसमध्ये होणारे बदल आणि नवीन व्हेरिएंट विरोधात लसीची प्रभावी क्षमता यावरुन ठरवावे लागेल की भारतासारख्या जास्त लोकसंख्येच्या देशात कोरोनाची स्थिती कशी राहील.

डॉ. स्वामीनाथन यांच्या मते, 2021 पर्यंत जगातील 30% लोकसंख्याचे लसीकरण होणार आहे. अशावेळी कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या आकड्यात घट होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. परंतु, हर्ड इम्यूनिटीपर्यंत पोहचण्यासाठी लसीकरणानंतर किती लोक यासाठी सक्षम असतील याची माहिती नसल्याचे डॉ. स्वामीनाथन यांनी सागितले.

भारतात आढळणारा व्हायरसचा नवीन व्हेरिएंट वेगाने पसरत आहे.
‘द हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी देशातील कोरोनाची सद्यस्थिती व लसीकरण यावर चर्चा केली. भारतात आढळणारा व्हायरस B1.617 व्हेरिएंट कोरोनाच्या मुळ स्ट्रेनपेक्षा जास्तच संक्रमित असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, हे नवीन व्हेरिएंट दोन भिन्न प्रकारांमध्ये विभागला गेले असून त्यांच्या म्यूटेशनमध्ये बदल दिसत आहे. त्यामुळे हे किती गंभीर व धोकादायक असेल हे त्यांचा रिझल्ट आल्यावरच कळणार असल्याचे डॉ. स्वामीनाथन म्हणाल्या.

भारतात वैद्यकीय सुविधा वाढवण्याची गरज
डॉ. स्वामीनाथन यांनी भारतात वैद्यकीय सुविधा वाढवण्याच्या गरजेवर भर दिला. भारतासह अनेक देशांमध्ये मृतांचा आकडा कमी करण्यात आले असून भारतातील आरोग्याच्या पायाभूत सुविधांना आणखी बळकटी देण्याची गरज असल्याचे स्वामीनाथन यांनी सांगितले. विशेष म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पातळीवर याला चांगले करणे महत्वाचे ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...