आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. एकट्या मुंबईत 13 जूनपर्यंत 55 हजार 451 प्रकरणे समोर आली. तर महाराष्ट्रात संक्रमितांची संख्या 1 लाखाच्या पार पोहचली आहे. राज्यात आतापर्यंत 3 हजार 717 मृत्यू झाले, त्यापैकी 55% म्हणजे 2 हजार 44 मृत्यू फक्त मुंबईत झाले आहेत.
देशातील कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 8 हजार 993 झाली आहे. यातील 17% रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. इतकेच नाही तर जितके रुग्ण आणि मृत्यू मुंबईत झाले, तितके देशातील 30 राज्यांत देखील झाले नाहीत. देशात 13 जूनपर्यंत 8 हजार 884 मृत्यू झाले, त्यापैकी 23% मृत्यू एकट्या मुंबईत झाले आहेत.
या सर्व कारणांमुळे, कोरोनाच्या बाबतीत मुंबई अमेरिकेच्या न्यूयॉर्कच्या मार्गावर आहे का असा प्रश्न वारंवार समोर येत आहे. न्यूयॉर्कमध्ये 3 लाख 81 हजार 714 रुग्ण आढळले आणि 24 हजार 495 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत झालेल्या एकूण मृत्यूंपैकी 22% मृत्यू न्यूयॉर्कमध्ये झाले आहेत. अमेरिकेत कोरोनामुळे मृतांचा आकडा 1 लाख 13 हजार 914 झाला आहे.
1) लोकसंख्या घनता: न्यूयॉर्कपेक्षा मुंबईत लोकसंख्या जास्त दाट आहे
मुंबई देशातील नाही तर जगतील दाट लोकसंख्येचे शहर आहे. येथे जवळपास 2 कोटींची लोकसंख्या 600 स्वेअर किमीत राहते. येथे प्रत्येक एक किमीच्या परिघात 33,000 हून अधिक लोक राहतात. तथापि, न्यूयॉर्कची लोकसंख्या फक्त 85 लाख आहे आणि प्रत्येक किमीच्या परिघात 10 हजाराहून अधिक लोक राहतात.
2) कोरोनाची गती: न्यूयॉर्कमध्ये वेग कमी झाला, मुंबईत वाढ झाली
न्यूयॉर्कमध्ये कोरोनाव्हायरसच्या नवीन प्रकरणांची गती कमी होण्यास सुरुवात झाली आहे, परंतु ती मुंबईत सातत्याने वाढत आहे. असा एक वेळ होता जेव्हा न्यूयॉर्कमध्ये दररोज 8 हजार ते 11 हजार नवीन प्रकरणे समोर येत होती.
11 जून पर्यंतचा डेटा न्यूयॉर्कच्या आरोग्य विभागाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. त्यानुसार गेल्या 14 दिवसांपासून येथे दररोज 1500 पेक्षा कमी नवीन प्रकरणे नोंदविली जात आहेत.
तर, 17 मेपासून मुंबईत रोज एक हजाराहून अधिक नवीन प्रकरणे नोंदवली जात आहेत. 17 मे नंतर 11 जूनपर्यंत मुंबईत 35 हजार 263 प्रकरणे समोर आली आहे. म्हणजेच, मुंबईत संसर्ग झालेल्या 65% पेक्षा जास्त रुग्ण 17 मे नंतर आढळले आहेत.
3) टेस्टिंग : न्यूयॉर्कमध्ये झालेल्या चाचण्यांच्या 10% चाचण्या मुंबईत झाल्या नाहीत
न्यूयॉर्कमध्ये 11 जूनपर्यंत 28 लाख 1 हजार 400 लोकांचा चाचणी घेण्यात आली. तर 12 जून पर्यंत मुंबईत 2 लाख 47 हजार 696 लोकांची कोरोना चाचणी झाली. म्हणजेच न्यूयॉर्कमध्ये झालेल्या चाचण्यांच्या तुलनेत मुंबईत फक्त 8.84% चाचण्या झाल्या आहेत.
इतकेच नव्हे तर न्यूयॉर्कपेक्षा मुंबईत पॉझिटिव्हिटीचा रेट देखील जास्त आहे. न्यूयॉर्कचा पॉझिटिव्हिटी रेट 13.6% आणि मुंबईचा 21.79% आहे.
याशिवाय 12 जूनपर्यंत मुंबईत दर 10 लाख लोकसंख्येमागे 19 हजार 42 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. तर न्यूयॉर्कमध्ये हा आकडा 1 लाख 44 हजार 14 आहे.
4) मृत्यू : मुंबईत 77% आणि न्यूयॉर्कमध्ये 95% मृत्यू 50 वर्षांवरील रुग्णांचा
बर्याच अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे की 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोनाव्हायरसचा सर्वाधिक धोका असतो. आकडेवारी देखील याची पुष्टी करते.
मुंबईत 12 जूनपर्यंत 2 हजार 42 लोकांचा मृत्यू झाला. यातील 77% म्हणजे 1 हजार 588 लोकांचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त होते. अशाप्रकारे न्यूयॉर्कमध्ये 24 हजार 495 मृत्यूंमध्ये 23 हजार 216 मृत्यू 50 वर्षांवरील रुग्णांचा झाला आहे. ही एकूण मृत्यूच्या 95% आहे.
5) रुग्णालय : मुंबईत 17,847 बेड, यातील आता 26% रिक्त
आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांसाठी आरोग्य सुविधेला तीन श्रेणींमध्ये विभागले आहे. पहिल्या श्रेणीमध्ये समर्पित कोविड रुग्णालये आहेत, जिथे गंभीर रूग्णांवर उपचार केले जातील. दुसरी श्रेणी कोविड हेल्थ सेंटरची आहे, जिथे कमी गंभीर रूग्ण दाखल केले जातील. तिसरी श्रेणी म्हणजे कोविड केअर सेंटर, जिथे कमी लक्षणे असलेली किंवा लक्षण नसलेले रूग्ण ठेवले जातील.
बीएमसीच्या आकडेवारीनुसार, 12 जूनपर्यंत या तिन्ही श्रेणींमध्ये 17 848 बेड आहेत, ज्यातील 13 हजार 256 अर्थात 76% बेडवर रुग्ण आहेत. यातील 1 हजार 197 आयसीयू बेड देखील आहेत, ज्यातील आता फक्त 20 बेड रिक्त आहेत. तर 5 हजार 325 ऑक्सिजन बेडपैकी 4 हजार 80 आणि 538 व्हेंटिलेटरपैकी 515 बेड भरलेले आहेत.
दोन्ही ठिकाणी संसर्ग का पसरला याची 3 कारणे
पहिले कारण : मुंबई आणि न्यूयॉर्क दोन्ही दाट लोकसंख्येची शहरे आहेत. मुंबईत दर एक किमीच्या परिघात 33 हजार लोक आणि न्यूयॉर्कमध्ये 10,000 पेक्षा जास्त लोक आहेत.
दुसरे कारण : मुंबईतील लोकल ट्रेन आणि न्यूयॉर्कमधील मेट्रो गाड्या इथल्या लोकांची पहिली पसंती आहेत. न्यूयॉर्क आणि मुंबईमध्ये दररोज कोट्यवधी लोक याद्वारे प्रवास करतात. दोन्ही ठिकाणी कोरोना वाढल्यानंतर लोक यातून प्रवास करत राहिले.
तिसरे कारण : मुंबई आणि न्यूयॉर्क दोन्ही आपापल्या देशाची आर्थिक राजधानी आहे. यामुळे येथे परदेशी लोकांचे येणे आणि येथील लोकांचे विदेशात जाणे सुरू असते. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियानुसार मार्च-एप्रिलमध्ये मुंबई विमानतळावर 4.79 लाख आंतरराष्ट्रीय आणि 16.71 लाख स्थानिक प्रवाशांची वर्दळ सुरू होती. तर न्यूयॉर्कमध्ये दरवर्षी 6 कोटींपेक्षा अधिक पर्यटक येतात. इतकेच नाही तर न्यूयॉर्कमध्ये सर्वाधिक चीनी नागरिक राहतात.
Sponsored By
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.