आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus News | Coronavirus Outbreak India Cases LIVE Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today Amit Shh Tested Positive

कोरोना अपडेट:देशातील रुग्ण ठीक होण्याचा दर 2% वाढला, तर मृत्यूदर 1% कमी, महाराष्ट्रात 10 हजारांपेक्षा जास्त पोलिस कर्मचारी संक्रमित; आतापर्यंत 19.17 लाख केस

मुंबईnat3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत देशभरात 19 लाख 59 हजार 369 जणांना कोरोनाची लागण झाली. चांगली बाब म्हणजे, ठीक होण्याचा दरही दिवसेंदिवस वाढत आहे. मागच्या एका दिवसात रिकव्हरी रेटमध्ये 2% वाढ होऊन 67% झाला आहे. सध्या देशात 5 लाख 93 हजार 673 रुग्णांवर उपचार सुरू असून, 13 लाख 24 हजार 519 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यादरम्यान, देशात 40,727 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात संक्रमण वेगाने वाढत आहे. आतापर्यंत राज्यात 4 लाख 68 हजार 265 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यात 10 हजारांपेक्षा जास्त पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय अनेक डॉक्टरांनाही लागण झाल्याचे समोर आले आहे. बुधवारी राज्यात 10,309 नवीन रुग्णांची नोंद झाली, तर 6,165 रुग्ण ठीक झाले. सध्या राज्यात 1,45,961 रुग्णांवर उपचार सुरू असून, 3,05,521 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यादरम्यान, 16,476 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.