आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus News Delta Plus Variant News Update; It Is Too Early To Predict That The Third Wave Of The Pandemic Will Come From The Delta Plus Variant; There May Be Other Reasons For This; News And Live Updates

आयसीएमआर वैज्ञानिकाचा दावा:डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे कोरोनाची तिसरी लाट येईल हे सांगणे घाईचे होईल, याचे इतरही कारणे असू शकतात

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • डेल्टा प्लस व्हेरिएंट नेमके काय?

डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता अनेक तज्ञ व्यक्त करत आहे. त्यासोबतच याबाबत अनेक दावेही प्रतिदावे केले जात आहे. परंतु, यावर इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) पूर्णविराम दिले आहे. आयसीएमआरचे डॉ. सुमित अग्रवाल म्हणाले की, प्रत्येक व्हायरसमध्ये म्यूटंट आढळणे ही सामान्य प्रवृत्ती आहे. आपल्याला यावर नियंत्रण ठेवता येत नाही. डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे कोरोनाची तिसरी लाट येईल हे सांगणेदेखील घाईचे होणार असल्याचे डॉ. अग्रवाल यांनी सांगितले. याचे इतरही कारणे असू शकतात असे ते म्हणाले.

कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात याचे रुप अल्फा होते. त्यानंतर डेल्टा आणि आता डेल्टा प्लस झाले आहे, त्यामुळे येत्या काळात याचे आणखी वेगळे म्यूटेशन पाहायला मिळू शकतात. हे म्यूटेशन चिंताजनक असून आपल्याला यासोबतच पुढे जावे लागणार असल्याचे डॉ. अग्रवाल म्हणाले. डॉ. सुमित अग्रवाल हे डिव्हीजन ऑफ अॅपिडेमियोलॉजी अँड कम्युनिकेबल डिसीज, आयसीएमआरमधील एका विभागातील वैज्ञानिक आणि प्रोग्राम अधिकारी आहेत.

डेल्टा प्लसचे तीन वैशिष्ट्ये

1. ते फार वेगाने पसरते.

2. यामुळे फुफ्फुसांना लवकर नुकसान पोहचते.

3. मोनोक्लोनल अॅन्टीबॉडी थेरपीचा प्रभाव कमी करते.

डेल्टा प्लस व्हेरिएंट नेमके काय?
कोरोनाच्या व्हायरसमध्ये झालेल्या बदलास विविध नावे देण्यात आली आहेत. देऊन भारतात सापडलेल्या कोरोना व्हायरसच्या डबल म्यूटंट स्ट्रेन B.1.617.2 ला जागतिक आरोग्य संघटनेने डेल्टा व्हेरिएंट असे नाव दिले. B.1.617.2 मध्ये आणखी एक म्यूटेशन K417N झाले आहे. हा व्हेरिएंट यापूर्वीच्या बीटा आणि गामा व्हेरिएंटमधूनच आहे. यातूनच तयार झालेल्या नवीन व्हेरिएंटला डेल्टा प्लस किंवा AY.1 आणि B.1.617.2.1 असे म्हटले जात आहे. K417N म्यूटेशन झालेले नवीन व्हेरिएंट आधीच्या व्हायरसच्या तुलनेत वेगाने पसरते. यावर व्हॅक्सीन आणि औषधींचा प्रभाव सुद्धा कमी पडतो.

डेल्टा प्लसविषयी 4 महत्त्वाचे पॉइंट्स

  • डेल्टा व्हेरिएंटचे सर्वस्ट्रेनला व्हेरिएंट ऑफ कंसर्न मानले जाईल. डेल्टा प्लविषयी सर्वात पहिले पब्लिक हेल्थ इंग्लंडमध्ये 11 जूनला एक रिपोर्ट देण्यात आला होता.
  • भारतात 45 हजारांपेक्षा जास्त सँपलची सीक्वेंसिंग झाली, ज्यामध्ये डेल्टा प्लसविषयी 40 प्रकरणे समोर आली. दरम्यान यामध्ये खूप जास्त वाढ दिसत नाही.
  • डेल्टा प्लसचे भारतात पहिले प्रकरण 5 एप्रिलला महाराष्ट्रात घेतलेल्या एका नमुन्यात आढळले होते.
  • जगभरात डेल्टा प्लसचे 205 प्रकरणे आढळले आहेत, ज्यामधून अर्ध्यापेक्षा जास्त प्रकरणे अमेरिका आणि ब्रिटेनमध्ये आहेत.

केंद्र सरकारची एडवायजरी
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार डेल्टा प्लस व्हेरियंटला कसे सामोरे जावे यासंबंधी माहिती देण्यासाठी राज्यांना पत्र लिहिले गेले आहे. भारतीय SARS-CoV-2जीनोमिक कन्सोर्टियाच्या नुकत्याच झालेल्या निष्कर्षांच्या आधारे महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश यांना मार्गदर्शक तत्त्वांनुसार या प्रकाराला सामोरे जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये याची प्रकरणे समोर आली आहेत, त्या ठिकाणी कंटेनमेंटचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...