आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus News Updates; High Court To Arvind Kejriwal Government Over Corona Patients In Hospital

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना रुग्णांवरील उपचार:उपराज्यपाल अनिल बैजल यांनी बदलला केजरीवाल सरकारचा 'तो' निर्णय, आता दिल्लीमध्ये सर्वांचा उपचार होईल

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रविवारी केजरीवाल सरकारने दिल्लीतील रुग्णालयात फक्त दिल्लीकरांना उपचार देण्याचा निर्णय घेतला होता

दिल्लीचे उप राज्यपाल अनिल बैजल यांनी केजरीवाल सरकारने घेतलेल्या निर्णयाला दुसऱ्याच दिवशी बदलले. बैजल यांनी सोमवारी सांगितले की, दिल्लीच्या सर्व हॉस्पीटल्समध्ये सर्वांवर उपचार व्हायला हवा. दिल्लीचा रहिवासी आहे का नाही, यावरुन उपचार ठरवला जाऊ शकत नाही, असेही बैजल म्हणाले.

रविवारी(दि.7) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, कॅबिनेटने निर्णय घेतला आहे की, दिल्ली सरकारअंतर्गत येणाऱ्या सरकारी आणि खासगी रुग्णालयात फक्त दिल्लीतील नागरिकांवरच उपचार केला जाईल. पण, केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयात सर्वांचा उपचार होईल.

तज्ज्ञांच्या समितीने चिंता व्यक्त केली होती

केजरीवाल यांनी सांगितले की, त्यांच्या सरकारने मागच्या आठवड्यात दिल्लीतील नागरिकांकडून त्यांचे मत मागितले होते. त्यातील 90 टक्के नागरिकांनी म्हटले होते की, कोरोना असेपर्यंत दिल्लीतील रुग्णालयांमध्ये फक्त दिल्लीतील नागरिकांवरच उपचार व्हावेत. तज्ज्ञांच्या कमिटीनेही आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले होते की, दिल्लीमध्ये जून महिन्याच्या शेवटपर्यंत 15 हजार बेटची गरज पडेल. त्यामुळे बाहेरील लोकांना रुग्णालयात जागा दिल्यास येथील नागरिकांना जागा मिळणार नाही.

हायकोर्टाने केजरीवाल यांना उत्तर मागितले

दिल्ली हायकोर्टाने सोमवारी एका याचिकेच्या सुनावनीदरम्यान म्हटले की, रुग्णालये संक्रमितांना दाखल करुन घेण्यास तयार नाहीत. याचिकेत अपील केली गेली की, दिल्लीसरकारला निर्देश द्यावेत की, त्यांनी सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयात रुग्णांना भरती करुन घेतले जाईल. हायकोर्टाने याप्रकरणी दिल्ली सरकारला उत्तर मागितले आहे.

बातम्या आणखी आहेत...