आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेत 11 दिवसांच्या आत देशात एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1 लाखांनी वाढून 8 लाखांच्या पार गेली आहे. सोमवारी सलग 5 व्या दिवशी 1 लाखांपेक्षा जास्त प्रकरणे समोर आली. सोमवारच्या तुलनेत जवळपास 12 हजार कमी रुग्ण आढळले आहेत. देशात गेल्या 24 तासांच्या दरम्यान 1 लाख 67 हजार 550 नवीन रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी रविवारी 1.79 लाख प्रकरणे आढळली होती. आता देशात एकूण 8 लाख 15 हजार 46 अॅक्टिव्ह केस आहेत.
सोमवारी 69,798 लोक बरे झाले, तर 277 लोकांचा मृत्यू झाला. दिलासादायक म्हणजे, महाराष्ट्र, दिल्ली आणि पश्चिम बंगाल, जे सर्वात चिंताजनक बनले होते, येथे सोमवारी नवीन प्रकरणांची संख्या देखील कमी झाली आहे, परंतु उत्तर प्रदेश या निवडणूक राज्यात नवीन प्रकरणांमध्ये वाढ होत आहे.
दरम्यान, दिल्लीतील सर्व खाजगी कार्यालये आणि रेस्टॉरंट-बार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा आदेश तात्काळ लागू होईल. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (DDMA) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.लोकांना घरून काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. काही वेळाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यातच राजधानीत निर्बंधांविषयी मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.
दिल्लीतील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पत्रकार परिषद घेणार आहेत. यामध्ये राजधानीतील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. दुपारी 12 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत दिल्लीत निर्बंधांविषयी मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.
महाराष्ट्रातील कोरोना स्थिती
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत नवीन रुग्णांमध्ये सुमारे 11 हजारांची घट झाली आहे. राज्यात सोमवारी 33,470 नवीन रुग्ण आढळले, तर रविवारी 44,388 रुग्ण आढळले. सर्वात चांगली बातमी म्हणजे महाराष्ट्रात महामारीतून बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट होत आहे. रविवारी 15,351 च्या तुलनेत सोमवारी 29,671 जणांना डिस्चार्ज मिळाला. यादरम्यान 8 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या आता 2,06,046 झाली आहे. राज्यात आतापर्यंत 69.53 लाख लोक संसर्गाच्या विळख्यात सापडले आहेत.
यामध्ये 66.02 लाख बरे झाले आहेत. तर 1 लाख 41 हजार 647 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात पॉझिटिव्हिटी रेट देखील 22% ने कमी होऊन 19.26% झाला आहे. मुंबईत कोरोना व्हायरसची तिसरी लाट पाहता मुंबई उच्च न्यायालाच्या मुख्य खंडपीठाने मंगळवारपासून दिवसातून केवळ 3 तास काम करण्याचा निर्णय घेतला आहे. हा आदेश 28 जानेवारीपर्यंत लागू राहणार असून या काळात केवळ तातडीच्या प्रकरणांची सुनावणी होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.