आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशभरातील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. रविवारी 2 जानेवारीला संपलेल्या आठवड्यात देशात कोरोनाच्या 1.23 लाख रुग्णांची नोंद झाली. हे 12 आढवड्यात सर्वात जास्त प्रकरणे होते. गेल्या आठवड्यात 41,169 प्रकरणे समोर आली होती. म्हणजेच एका आठवड्यात देशात कोरोना संक्रमण दर जवळपास तिप्पट झाला होता. रुग्णांमध्ये 82 हजारांची वाढ झाली.
बंगाल रनजी ट्रॉफी स्क्वाडचे 7 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह
13 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीमध्ये कोरोनाची एन्ट्री झाली आहे. बंगाल रणजी संघाच्या 7 खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. आता बीसीसीआय देशांतर्गत स्पर्धा सुरू होण्यापूर्वी तातडीची बैठक घेऊ शकते आणि ताजी परिस्थिती लक्षात घेता रणजी ट्रॉफी पुढे ढकलण्याचा विचारही केला जाऊ शकतो. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे सचिव स्नेहशिष गांगुली यांनी सांगितले की, सध्याची साथीची परिस्थिती लक्षात घेऊन, बंगाल क्रिकेट असोसिएशनने सुरक्षिततेचा उपाय म्हणून बंगालच्या सर्व क्रिकेटपटूंच्या आरटी-पीसीआर चाचण्या घेतल्या आहेत. यामध्ये 7 खेळाडू पॉझिटिव्ह आढळले आहेत.
जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया कोविड पॉझिटिव्ह, दोघेही घरी क्वारंटाईन
बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. जॉनने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून ही माहिती दिली. त्याने सांगितले की, तीन दिवसांपूर्वी मी एका व्यक्तीच्या संपर्कात आलो, ज्याच्याबद्दल मला नंतर कळले की तो कोरोना पॉझिटिव्ह आहे. आता प्रिया आणि मला संसर्ग झाला आहे. आम्ही दोघेही घरी क्वारंटाईन झालो आहोत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.