आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Omicron Cases India LIVE Update; Delhi Bhopal Indore Mumbai Delhi 7 January 2022

कोरोना देशात:तिसऱ्या लाटेत पहिल्यांदा 1,16,990  नवीन रुग्ण आढळले, 302 मृत्यू; 7 दिवसात 5 पटींनी वाढले नवीन संक्रमित

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेत पहिल्यांदा संक्रमणाचा आकडा 1 लाखांच्या आकड्याला पार करुन गेला आहे. 24 तासात संक्रमणाचे 1 लाख 16 हजार 990 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. या दरम्यान 302 लोकांचा मृत्यू झाला आहे. अ‍ॅक्टिव्ह केसमधून 85,958 ची वाढ झाली आहे. 31 डिसेंबरला देशात 22,775 नवीन प्रकरणे सापडली होती. या हिशोबाने देशात एका आठवड्याच्या आत प्रकरणे जवळपास 5 पटींनी वाढले आहेत.

तर देशात एकूण प्रकरणांविषयी बोलायचे झाले तर आतापर्यंत 3.52 कोटींपेक्षा जास्त लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यामध्ये 3.43 कोटी लोक बरे झाले आहेत. तर 4 लाख 83 हजार 178 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. अ‍ॅक्टिव्ह केस म्हणजेच उपचार करत असलेल्या रुग्णांचा आकडा वाढून 3,65,439 झाला आहे.

येथे गुरुवारी 36,265 लोक संक्रमित आढळले आहेत. 8907 लोक बरे झाले आणि 13 लोकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत राज्यात 67.93 लाख लोक संक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. यामध्ये 65.33 लाख लोक बरे झाले आहेत. तर 1 लाख 41 हजार 594 लोकांचा मृत्यू झाला आहे. 1,14,847 रुग्णांवर अजुनही उपचार सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...