आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Omicron Cases India LIVE Update; Delhi Bhopal Indore Mumbai Delhi | BMC Issues Fresh Guidelines 6 January 2021

कोरोना देशात:गेल्या 24 तासांमध्ये संक्रमणाचे 91 हजार नवीन प्रकरणे आले; हे गेल्या 7 महिन्यात सर्वात जास्त, 325 जणांनी गमावला जीव

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोनाची तिसरी लाट आली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 90,858 नवीन संक्रमित आढळले आहेत. 19,152 रुग्ण बरे झाले आहेत आणि 325 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे अॅक्टिव्ह केसमध्ये 71,381 ची वाढ नोंदवण्यात आली आहे. नवीन प्रकरणांचा आकडा गेल्या 7 महिन्यात सर्वात जास्त आहे. यापुर्वी 10 जूनला 91,849 नवीन प्रकरणे आले होते.

देशात या महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 3.51 कोटींपेक्षा जास्त लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. 3.43 कोटी लोक बरे झाले आहेत. 4.82 लाख लोकांनी जीव गमावला आहे. तर 2.75 लाखांपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

महाराष्ट्रात बुधवारी 26,538 लोक संक्रमित आढळले आहेत. 5331 लोक बरे झाले आणि 8 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात 67.57 लाख लोक संक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. यामध्ये 65.24 लाख लोक बरे झाले आहेत. तर 1.41 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. 87, 505 रुग्णांवर अद्याप उपचार सुरु आहेत.

बातम्या आणखी आहेत...