आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:गेल्या 24 तासात आढळले 25,420 नवीन प्रकरणे; केंद्र समितीचा इशारा - ऑक्टोबरमध्ये येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, मुलांसाठी रुग्णालयांमध्ये तयारी करण्याच्या सुचना

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आजघडीला 3.28 लाख सक्रिय रुग्ण आहेत.

देशातील कोरोनाच्या नवीन प्रकरणात चढ-उतार होत आहे. देशात गेल्या 24 तासात म्हणजे रविवारी 25 हजार 420 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. दरम्यान, 44 हजार 103 लोक उपचार घेत बरे झाले तर यामध्ये 385 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 3.16 कोटी लोक उपचार घेत बरे झाले आहे. यासोबतच सक्रिय रुग्णांतदेखील रविवारी 19 हजार 71 ने घट झाली. विशेष म्हणजे गेल्या 6 दिवसापासून सक्रिय रुग्णांत मोठी घट होत आहे. देशात आजघडीला 3.28 लाख सक्रिय रुग्ण आहेत.

गृह मंत्रालयाचा पीएमओला इशारा
देशात ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाच्या एका पॅनलने पंतप्रधान कार्यालयाला तसा इशारादेखील दिला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या (एनआयडीएम) अंतर्गत स्थापन केलेल्या समितीने हा इशारा दिला आहे. दरम्यान, या लाटेचा मुलांना मोठ्या प्रमाणावर धोका असून त्यामुळे रुग्णालयांमध्ये तयारी करण्याच्या सुचनाही दिल्या आहेत.

देशात कोरोना महामारी आकड्यांमध्ये

  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण नवीन केस आल्या : 25,420
  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण बरे झाले : 44,103
  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण मृत्यू : 385
  • आतापर्यंत एकूण संक्रमित झाले : 3.24 कोटी
  • आतापर्यंत बरे झाले : 3.16 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.34 लाख
  • सध्या उपचार करत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या : 3.28 लाख
बातम्या आणखी आहेत...