आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:एका दिवसात आढळले 40,279 नवे प्रकरणे, 40,032 बरे झाले तर 541 मृत्यू; केरळमध्ये नवीन संक्रमितांमध्ये वाढ

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात सध्या 4.02 लाख लोकांवर उपचार सुरु आहे

देशातील कोरोनाचा प्रार्दुभाव आता पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत म्हणजे शनिवारी देशात 40 हजार 279 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, 40 हजार 32 लोक उपचार घेत बरे झाले तर 541 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच सक्रिय रुग्णांच्या संख्येतदेखील 300 ने घट झाली आहे.

तर दुसरीकडे, केरळ राज्यातील परिस्थिती कोरोनामुळे बिघडत चालली आहे. राज्यात शनिवारी 18 हजार 531 लोकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा आकडा गेल्या 51 दिवसातील सर्वात जास्त आहे. यापूर्वी 3 जून रोजी 18 हजार 853 लोक कोरोनाबाधित आढळले होते.

देशात कोरोना महामारीचे आकडे

  • मागील 24 तासात एकूण नवीन रुग्ण : 40,279
  • मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 40,032
  • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 541
  • आतापर्यंत एकूण संक्रमित : 3.13 कोटी
  • आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण : 3.05 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.20 लाख
  • सध्या उपचार सुरु असलेल्या एकूण रुग्णांची संख्या : 4.02 लाख
बातम्या आणखी आहेत...