आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:गेल्या 24 तासांत आढळले 14,902 नवीन प्रकरणे, हा सात महिन्यातील सर्वात कमी आकडा, देशात 2.84 लाख रुग्णांवर उपचार सुरु

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील कोरोना महामारीचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांत 14 हजार 902 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, 24 हजार 251 रुग्ण उपचार घेत बरे झाले तर यामध्ये 181 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यापूर्वी 1 मार्च रोजी देशात 12 हजार 270 लोकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

यासोबतच देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. देशात आजघडीला 2.84 लाख लोकांवर उपचार सुरु आहे. हा आकडा गेल्या 211 दिवसांतील सर्वात कमी असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी 188 मार्च रोजी 2.68 लाख सक्रिय रुग्ण होते.

देशातील कोरोना महामारी आकड्यांमध्ये

  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण नवीन प्रकरणे आली: 14,907
  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण बरे झाले: 24,251
  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण मृत्यू: 181
  • आतापर्यंत एकूण संक्रमित: 3.36 कोटी
  • आतापर्यंत एकूण बरे झाले : 3.29 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू: 4.47 लाख
  • सध्या उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांची संख्या: 2.84 लाख
बातम्या आणखी आहेत...