आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना अपडेट:मागील 7 दिवसांपासून दररोज एक हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू, देशातील एकूण रुग्णसंख्या 42.84 लाखांवर

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशभरात सोमवारी 1,129 रुग्णांचा मृत्यू झाला, तर आतापर्यंत 72,843 मृत्यू

देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील सात दिवसातील आकडेवारी भयंकर आहे. 1-7 सप्टेंबरदरम्यान 5 लाख 89 हजार 644 रुग्ण वाढले तर दररोज एक हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला. जुलैच्या पहिल्या आठवड्यात 500 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला होता, पण या महिन्यात हा आकडा दुप्पट झाला आहे.

देशातील लोकसंख्येच्या हिशोबात मृत्यूदर 1.70% आहे, हा जगातील सर्वात कमी आङे. तर, सर्वात जास्त मॅक्सिकोमध्ये 10.7% आहे. स्पेनमध्ये 5.9% आणि अमेरिकेत 3% आहे. तिकडे,सोमवारी 75 हजार 022 रुग्ण वाढले तर 74 हजार 123 रुग्णांनी कोरोनावर मात केली. यासोबतच, देशातील कोरोना रुग्णांची संख्या 42 लाख 84 हजार 103 झाली आहे. हे आकडे covid19india.org नुसार आहेत.

जंतुनाशक फवारा आरोग्यास घातक, सरकार आणणार बंदी; लवकरच अधिसूचना

देशभरात बऱ्याच ठिकाणी कोरोनापासून बचावासाठी निर्जंतुकीकरण कक्षात अंगावर जंतुनाशकांचा फवारा मारला जातो. मात्र, असे करणे आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे सांगत केंद्र सरकार त्यावर लवकरच बंदी आणणार आहे. सुप्रीम कोर्टाला सोमवारी ही माहिती देत सरकार म्हणाले की, याबाबत लवकरच अधिसूचना जारी केली जाईल.