आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:मागील 24 तासांत आढळले 36,028 नवे रुग्ण, 39,828 बरे झाले; सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा बरे होण्याचे प्रमाण जास्त

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सध्या देशात 3.96 लाख लोकांवर उपचार सुरु आहे

कोरोना महामारीची दुसरी लाट आता हळूहळू कमी होत आहे. देशात गेल्या 24 तासात 36 हजार 28 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, 39 हजार 828 रुग्ण उपचार घेत बरे झाले तर 447 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. यापूर्वी 6 ऑगस्ट रोजी 38 हजार 705 रुग्ण आढळले तर 40 हजार 26 लोक बरे झाले आहे.

दिलासादायक बातमी म्हणजे देशात गेल्या 14 दिवसातील हा आकडा सर्वात कमी आहे. यापूर्वी 26 जुलै रोजी 30 हजार 820 लोकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तर दुसरीकडे, केरळ राज्यातदेखील कोरोनाच्या नवीन प्रकरणात घट होताना दिसत आहे. राज्यात रविवारी 18 हजार 607 लोक कोरोनाबाधीत झाले होते. दरम्यान, 20 हजार 108 लोक उपचार घेत बरे झाले तर 93 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात कोरोना महामारीचे आकडे

  • मागील 24 तासात एकूण आढळून आलेले रुग्ण : 36,028
  • मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 39,828
  • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 447
  • आतापर्यंत एकूण संक्रमित : 3.19 कोटी
  • आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण : 3.11 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.28 लाख
  • सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या : 3.96 लाख
बातम्या आणखी आहेत...