आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Coronavirus Outbreak In India: PM Modi Declear Big Announce For Orphan In Corona Pendamic; News And Live Updates

मोठा निर्णय:कोरोनामुळे अनाथांना मोफत शिक्षण, 23 व्या वर्षी 10 लाख रुपये; 5 लाखांचा आरोग्य विमा

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • कोरोनामुळे मातृ-पितृछत्र हरवलेल्या मुलांसाठी “पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन’ योजना सुरू

देशात कोरोना महामारीचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे लाखो लोकांचा जीव गेला असून अनेकांचे घर उद्ध्वस्त झाले आहे. या महामारीने अनेक मुलांचे आई-वडील हिरावून नेले असून यामुळे मुले अनाथ झाले आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी केंद्र सरकारने या अनाथ मुलांसाठी मोठी घोषणा केली आहे. दरम्यान, कोरोनामुळे ज्यांचे आई-वडील मरण पावले आहे. अशा मुलांची जबाबदारी आता केंद्र सरकारने घेतली आहे.

त्याकरीता पंतप्रधान केअर फंडमधून 10 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. त्यासोबतच त्या मुलांचा शिक्षणाचा खर्चदेखील केंद्र सरकार करणार आहे. अशा अनाथ मुलांना 18 वर्षांपर्यंत प्रत्येक महिने आर्थिक मदत दिली जाईल. याव्यतिरिक्त 23 वर्षे पूर्ण झाल्यावर 10 लाख रुपयांची मदतदेखील मिळणार आहे.

PM केयर्स फॉर चिल्ड्रेन योजनेतर्गंत मिळणार मदत
पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार, कोरोनामुळे ज्या आई-वडीलाने किंवा मुलाने एकमेंकाना गमावले आहे. त्या दोघाना पीएम केयर्स फॉर चिल्ड्रेन योजना अंतर्गत मदत दिली जाणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले.

कोरोनाने मृत्यू झाल्यास वारसाला मिळणार पेन्शन
कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या वारसास ईएसआयसीच्या पेन्शन योजनेचा लाभ मिळेल. वारसास कर्मचाऱ्याच्या सरासरी वेतनाच्या 90 टक्के पेन्शन मिळेल. ही योजना 24 मार्च 2020 ते 24 मार्च 2022 या कालावधीपर्यंत लागू राहणार आहे. ईएसआयसीमध्ये सध्या सुमारे 3 कोटी लोकांची नोंदणी आहे. तर, ईडीएलआयनुसार जास्तीत जास्त देण्यात येणाऱ्या लाभाची रक्कमही ७ लाख रुपये करण्यात आली आहे. यात किमान 2.5 लाख रुपयांचा लाभ मिळेल. ही तरतूद 15 फेब्रुवारी 2020 पासून तीन वर्षांसाठी लागू राहील.

योजनेतील महत्वाचे मुद्दे

मुलाच्या नावावर फिक्स्ड डिपॉझिट

 • पीएम केअर फंडमधून अशा प्रत्येक मुलासाठी निधी तयार केला जाणार असून त्यामध्ये 10 लाख रुपये जमा केले जातील.
 • याद्वारे, मुलांना वयाच्या 18 वर्षांपर्यंत दरमहा निश्चित प्रमाणात मदत मिळेल.
 • वयाच्या 23 व्या वर्षी त्याला ही संपूर्ण रक्कम एकत्रित दिली जाईल.

शालेय शिक्षण

 • दहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना जवळच्या मध्यवर्ती शाळा किंवा खाजगी शाळेत डे स्कॉलर म्हणून प्रवेश दिला जाईल.
 • जर त्या मुलांचा प्रवेश खासगी शाळेत झाल्यास पीएम केअर फंडकडून शिक्षण हक्कांच्या नियमांनुसार फी दिली जाणार आहे.
 • मुलांचे शालेय ड्रेस, पुस्तके आणि नोटबुकवरील खर्चदेखील दिला जाईल.

उच्च शिक्षणासाठी मदत

 • या मुलांना सध्या अस्तित्त्वात असलेल्या शैक्षणिक कर्जाच्या निकषांनुसार प्रोफेशनल कोर्स किंवा उच्च शिक्षण घेण्यासाठी कर्ज घेण्यासाठी मदत केली जाईल. या कर्जाचे व्याज पीएम केअरमधून भरण्यात येणार आहे.
 • पर्यायी व्यवस्था म्हणून अशा मुलांना केंद्र किंवा राज्य सरकारच्या योजनांतर्गत पदवी किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी कोर्स फी किंवा शिकवणी फी इतकी शिष्यवृत्ती दिली जाईल.
 • सध्याच्या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत पात्र नसलेल्या मुलांसाठी त्यांना पीएम केअरकडून अशीच शिष्यवृत्ती मिळेल.

आरोग्य विमा

देशातील कोरोना महामारीचे आकडे

 • आयुष्मान भारत योजनेंतर्गत (PM-JAY) सर्व मुलांना लाभार्थी मानले जाईल. त्यांना पाच लाख रुपयांचे आरोग्य विम्याचे संरक्षण मिळणार आहे.
 • वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत या मुलांची प्रीमियम रक्कम पीएम केअरमधून दिली जाणार आहे.
 • मागील 24 तासात एकूण नवीन केस : 1.74 लाख
 • मागील 24 तासात एकूण बरे झालेले : 2.85 लाख
 • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 3,611
 • आतापर्यंत एकूण संक्रमित : 2.77 कोटी
 • आतापर्यंत एकूण बरे झालेले : 2.51 कोटी
 • आतापर्यंत एकूण मृत्यू : 3.22 लाख
 • सध्या उपचार सुरु असलेले एकूण रुग्ण : 22.12 लाख
बातम्या आणखी आहेत...