आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Coronavirus Outbreak In India Updates: In 24 Hours 1.33 Lakh Patients Are Found, 3 June 2021 News And Live Updates

कोरोना देशात:गेल्या 24 तासांत आढळले 1.33 लाख नवे रुग्ण, 2,897 मृत्यू, 2.11 लाख बरे झाले; 5 राज्यांतील सक्रिय प्रकरणे 1 लाखांवर

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • देशात 17.08 लाख लोकांवर उपचार सुरु आहे

देशात काही दिवसांपासून कोरोनाच्या नवीन प्रकरणात घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत म्हणजेच बुधवारी देशात 1 लाख 33 हजार 953 लोकांचा कोरोना अवहाल पॉझिटिव्ह आला आहे. हा आकडा मंगळवारच्या आकडेवारीपेक्षा 800 ने जास्त आहे. तर दुसरीकडे, कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही कमी होताना दिसत नाहीये. देशात बुधवारी 2 हजार 897 लोक कोरोनामुळे मरण पावले आहे.

दिलासा देणारी बातमी म्हणजे, देशात गेल्या 24 तासांत 2 लाख 11 हजार 750 लोक कोरोनाचा उपचार घेत बरे झाले आहे. त्यामुळे सक्रिय प्रकरणात म्हणजेच उपचार घेणाऱ्यांच्या संख्येत 80 हजार 749 ने घट झाली आहे. देशात एकीकडे कोरोनाचे नवीन रुग्ण कमी होत आहे तर दुसरीकडे देशातील 5 राज्यांत आढळणाऱ्या रुग्णांचा आकडा 1 लाखांपेक्षा जास्त आहे. यामध्ये कर्नाटक (2.93 लाख), तमिळनाडू (2.88 लाख), महाराष्ट्र (2.16 लाख), केरळ (1.92 लाख) और आंध्र प्रदेश (1.43 लाख) यांचा समावेश आहे.

देशात कोरोना महामारीचे आकडे

 • मागील 24 तासात एकूण नवीन केस : 1.33 लाख
 • मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 2.11 लाख
 • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 2,887
 • आतापर्यंत संक्रमित : 2.84 कोटी
 • आतापर्यंत बरे झालेले रुग्ण : 2.63 कोटी
 • आतापर्यंत एकूण मृत्यू : 3.38 लाख
 • उपचार सुरु असलेल्या एकूण रुग्णांची संख्या : 17.08 लाख

बातम्या आणखी आहेत...