आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India 17 Jan Cases And Deaths News And Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today Mumbai Delhi Coronavirus News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रिकव्हरी रेट राष्ट्रीय दर 96.6% पेक्षा जास्त, अरुणाचल-आंध्रात 99% पेक्षा अधिक रुग्ण बरे झाले

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सध्या देशात केवळ 2 लाख 5 हजार 811 रुग्णांवर उपचार (अ‍ॅक्टीव्ह रुग्ण) सुरू आहे

देशात लसीकरण सुरु झाल्यासोबत कोरोनाबाबत आणखी चांगली बातमी आली आहे. कोरोनामु्क्तीच्या दराबाबतीत 27 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश राष्ट्रीय रिकव्हरी रेट 96.6% पेक्षा पुढे गेले आहे. म्हणजेच देशात प्रत्येक 100 रुग्णांपैकी सुमारे 96 रुग्ण बरे होत आहेत. परंतु याच्या तुलनेत 27 राज्यांतील आणि केंद्रशासित प्रदेशात यापेक्षही जास्त रुग्ण कोरोनाला मात देत आहेत.

अरुणाचल प्रदेशात कोरोनामुक्तीचा दर 99.3% आणि आंध्र प्रदेशात 99% झाला आहे. अरुणाचलमध्ये कोरोनाची एकूण 16 हजार 805 प्रकरणे समोर आली आहेत. यापैकी 6 हजार 687 रुग्ण बरे झाले आणि 56 जणांचा मृत्यू झाला. येथे सध्या केवळ 62 रुग्णांवर उपचार सुरू आहे. दुसरीकडे आंध्र प्रदेशात 8 लाख 85 हजार 824 प्रकरणे समोर आली. यापैकी 8 लाख 76 हजार 968 रुग्ण बरे झाले असून 7 हजार 139 रुग्णांचा मृत्यू झाला. येथेही सध्या 1,987 रुग्णांवर उपचार सुरू आहे.

देशात केवळ 2.05 लाख अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

देशभरात मागील 24 तासांत 15 हजार 50 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. 17 हजार 201 लोक बरे झाले आणि 181 जणांचा मृत्यू झाला. देशातील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 1 कोटी 5 लाख 58 हजार पार झाला आहे. चांगली बाब म्हणजे यापैकी 1 कोटी 1 लाख 96 हजारांपैङा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशात केवळ 2 लाख 5 हजार 811 रुग्णांवर उपचार (अ‍ॅक्टीव्ह रुग्ण) सुरू आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 52 हजार 311 जणांचा मृत्यू झाला आहे.

नवीन प्रकरणे आढळण्याच्या बाबतीत भारत जगातील 12 वा देश

आणखी एक दिलासादायक बातमी आहे. प्रत्येत दिवशी कोरोनाचे नवीन रुग्ण आढळण्याच्या बाबतीत भारत जगातील 12 वा देश बनला आहे. काही दिवसांपूर्वी भारत 7-9व्या स्थानावर होता. दररोज मृत्यूच्या बाबतीत भारत 14 व्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत जास्तीत जास्त प्रकरणे आढळून येत आहेत आणि येथे मृत्यूंची संख्या ही सर्वाधिक आहे.

बातम्या आणखी आहेत...