आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशात सोमवारी कोरोना संक्रमणाचे 421 नवीन प्रकरणे समोर आली आहे. यातच आता अरुणाचल प्रदेश आणि पुडुचेरीने सोमवारी लॉकडाउन 30 एप्रिलपर्यंत लॉकडाउन वाढवण्याची घोषणा केली आहे. या दोन राज्यांना मिळून आतापर्यंत सात राज्यांनी लॉकडाउन वाढवला आहे. यापूर्वी, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगाणाना, पंजाब आणि ओडिशाने लॉकडाउन वाढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फर्सिंगनंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे.
देशात आज कोरोनाची 421 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यात महाराष्ट्र 82, राजस्थान 43 ,उत्तरप्रदेश 30, मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये 22-22, तर बिहार आणि असममध्ये 1-1 रुग्ण सापडले. यासोबत संक्रमितांची एकूण संख्या 9 हजार 632 वर पोहोचली आहे. ही आकडेवारी covid19india.org वेबसाइट आणि राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार आहे. तर आरोग्य मंत्रालयानुसार, सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत देशभरात 9 हजार 152 लोक संक्रमित आहेत. यातील 7 हजार 987 रुग्णांवर उपचार सुरू आहे. 856 बरे झालेत आणि 308 जण मृत्युमुखी पडले.
आजपासून आसाम आणि मेघालयात दारुची दुकाने उघडतील
आसाम आणि मेघालयमध्ये लॉकडाउन संपण्यापूर्वीच राज्य सरकारने सोमवारपासून दारुची दुकाने उघडण्यास मंजूरी दिली आहे. लोकांची मागणी पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकाकडून सांगण्यात आले. दुकानात कमीत कमी स्टाफ ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मेघालयात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. तर आसामध्ये 29 संक्रमित आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.