आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases 1 May 2020 LIVE Updates, Novel Corona (COVID 19) Death Toll India News And Updates

देशात कोरोना:देशातील कोरोना बाधितांचा आकडा 35 हजारांच्या पुढे; नरेंद्र मोदींची हायलेव्हल मीटिंग अडिच तास चाचली, लॉकडाउनसह अनेक मुद्द्यांवर चर्चा

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात 24 तासांत 1801 प्रकरणे समोर आली, 630 बरे झाले आणि 75 जणांचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी लॉकडाउन आणि कोरोना महामारीवर चर्चा करण्यासाठी हायलेव्लह मीटिंग बोलवली होती. ही मीटिंग अंदाजे अडिच तास चालली. यादरम्या देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 35 हजार 20 झाला आहे. शुक्रवारी आंध्रप्रदेशात 60, पश्चिम बंगाल 37, राजस्थान 33, कर्नाटक 11, हरियाणा 8, ओडिशा 4 आणि बिहारमध्ये 1 कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे.

एकूण संक्रमितांपैकी 9 हजारांपेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत. गुरुवारी महाराष्ट्रात सर्वाधिक 583, गुजरातमध्ये 313, राजस्थानात 144, पंजाबमध्ये 105, मध्यप्रदेशात 65 यांसह 1799 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ही आकडेवारी covid19india.org आणि राज्य सरकारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशात 35 हजार 43 कोरोनाग्रस्त आहेत. यातील 25 हजार 7 जणांवर उपचार सुरु आहेत. 8888 रुग्ण बरे झाले आणि 1148 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...