आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases 10 July News And Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Bihar Punjab Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

देशात कोरोना:कोरोनावर मात करून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आज 5 लाखांच्या वर जाईल; रिकव्हरी रेट आता 63% झाला

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जास्त रुग्ण असलेल्या देशांत सर्वात वेगवान रिकव्हरी भारतातच

देशात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत असली तरी बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत ७.८७ लाख रुग्णांपैकी ४.९३ लाख बरे झाले. आता रोज १८ हजारहून अधिक रुग्ण बरे होत आहेत. या हिशेबाने शुक्रवारी रात्री ही संख्या ५ लाखांच्या पुढे जाईल. रिकव्हरी रेटमध्ये भारत जगात १९ व्या स्थानी आहे. मात्र, अमेरिका, ब्राझील आणि भारत या वेगाने रुग्ण वाढणाऱ्या देशांत रिकव्हरी भारतात सर्वात वेगाने झाली आहे.

> १ मेपासून आतापर्यंत भारतात रिकव्हरी रेट ३५.७५% वाढला आहे. ब्राझीलमध्ये रिकव्हरी रेट भारताहून अधिक. मात्र, रिकव्हरीत वाढीचा वेग भारतातच अधिक आहे.

> सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात रिकव्हरी रेट ६०% होताच देशातील संख्या ७०% च्या पुढे जाईल. भारत चांगली रिकव्हरी असलेल्या टॉप-१० देशांत दाखल होईल.

> वास्तव : भारतात मृत्यू पावलेले ८६% कोरोना रुग्ण ४५ वर्षांवरील

> दोन महिन्यांत सर्वाधिक 55% पर्यंत रिकव्हरी गुजरात, मप्रमध्ये वाढली

0